बाथरूममधील सवयी ठरू शकतात घातक; 'या' चुका करणं टाळा अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 03:33 PM2019-07-30T15:33:34+5:302019-07-30T15:47:03+5:30

नियमितपणे बाथरूमचा वापर हा केला जातो. मात्र बाथरूमबाबत असेलल्या काही चुकीच्या सवयी या शरीरासाठी हानिकारक ठरतात. 

these bathrooms habits are extremely dangerous for health | बाथरूममधील सवयी ठरू शकतात घातक; 'या' चुका करणं टाळा अन्यथा...

बाथरूममधील सवयी ठरू शकतात घातक; 'या' चुका करणं टाळा अन्यथा...

Next

स्वच्छता ही अत्यंत गरजेची असते. त्यामुळे दैनंदिन जीवनात छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. नियमितपणे बाथरूमचा वापर हा केला जातो. मात्र बाथरूमबाबत असेलल्या काही चुकीच्या सवयी या शरीरासाठी हानिकारक ठरतात. 

टूथब्रश योग्य वेळी बदला

टूथब्रशचा वापर हा दात घासण्यासाठी केला जातो. त्यामुळे टूथूब्रश दात घासण्याआधी आणि नंतर स्वच्छ धुवून ठेवा. चांगल्या दर्जाच्या टूथब्रशचा वापर करा. तसेच काही दिवसांनंतर टूथब्रश नक्की बदला. 

ओला टॉवेल बाथरूममध्ये ठेवणे 

बाथरूममध्ये सर्वच जण हमखास टॉवेलचा वापर करतात. अनेकदा ओला टॉवेल हा कुठेही ठेवला जातो. तसेच तो बाथरूममध्येच अनेक जण विसरतात. तर काही जण त्याच ओल्या टॉवेलचा दुसऱ्या दिवशी वापर करतात. मात्र ही सवय महागात पडू शकते. रोज स्वच्छ टॉवेलचा वापर करावा. आरोग्यासाठी ते फायदेशीर असतं. 

बाथरूममध्ये फोनचा वापर

बाथरूममध्ये फोनचा वापर करण्याची अनेकांना सवय असते. मात्र बाथरूममध्ये फोनचा वापर करणं धोकादायक ठरू शकतं. बाथरूममध्ये बॅक्टेरिया असतात जे फोनला असलेल्या छिद्रामध्ये अथवा स्क्रीनवर बसतात. त्यामुळे फोन हातात घेतल्यावर ते शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं.

बॉडीस्क्रबर बदला

अनेकांना बॉडीस्क्रबर वापरण्याची सवय असते. मात्र काही दिवसांनंतर बॉडीस्क्रबर बदला कारण जर स्क्रबर बदलला नाही तर त्वचेसंदर्भात आजार होण्याची शक्यता असते. 

बाथरूम स्वच्छ ठेवा

बाथरूमचा वापर दररोज केला जात असल्याने ते नेहमी स्वच्छ ठेवा. बाथरूम स्वच्छ ठेवण्यासाठी बाजारात अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. त्यामुळे त्याचा वापर करा जेणेकरून आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल. 

तुम्हाला माहितीये का तुम्ही आयुष्यातील किती वेळ बाथरूममध्ये घालवता?

तुम्ही अनेकदा काही लोकांना म्हणताना ऐकलं असेल की, त्यांना बाथरूममध्ये नवनवीन आयडिया येतात आणि त्यांना बाथरूममध्ये जास्त शांतता मिळते. जर तुम्हालाही असं वाटत असेल की, बाथरूममध्ये सगळ्यात जास्त शांतता किंवा आराम मिळतो तर तुम्ही बरोबर आहात. कारण एका सर्व्हेतूनही हे सिद्ध झालं आहे. हा दावा इंग्लंडमध्ये करण्यात आलेल्या एका सर्व्हेतून करण्यात आला आहे. हा सर्व्हे बाथरूमवर करण्यात आला. एक studyfinds.org ने दिलेल्या वृत्तानुसार, हा सर्व्हे U.K. home-goods outlet B&Q कडून करण्यात आला आहे. यात साधारण 2 हजार लोकांना सहभागी करून घेण्यात आलं होतं. या सर्व्हेचा उद्देश लोकांना एक बेस्ट बाथरूम तयार करून देणे हा होता. यानुसार, पुरूष 373 दिवस म्हणजे दिवसाला 23 मिनिटे आणि महिला 456 दिवस म्हणजे दिवसातील 29 मिनिटे बाथरूममध्ये घालवतात.


 

Web Title: these bathrooms habits are extremely dangerous for health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.