पुरूषांना रात्री झोपेत जास्त घाम येण्याची ही असू शकतात कारणे, जाणून घ्या उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 05:24 PM2022-08-29T17:24:13+5:302022-08-29T17:26:37+5:30
Causes Of Night Sweats In Men: तसे तर पुरूषांना रात्री झोपताना घाम येण्याची वेगवेगळी कारणे आहेत. पण यांकडे तुम्ही दुर्लक्ष केलं तर समस्या वाढू शकते. चला जाणून घेऊ पुरूषांना रात्री घाम येण्याची कारणे..
Causes Of Night Sweats In Men: अनेक पुरूषांना रात्री झोपताना फार जास्त घाम येतो. घामामुळे ते व्यवस्थित झोपूही शकत नाहीत. ज्यामुळे दुसऱ्या दिवशी त्यांना खूप थकवा जाणवतो. याचा प्रभाव थेट आरोग्यावर पडतो. असं होतं कारण रात्री चांगल्याप्रकारे न झोपल्याने तुम्हाला नंतर स्ट्रेस आणि चिंता जाणवू लागते. तसे तर पुरूषांना रात्री झोपताना घाम येण्याची वेगवेगळी कारणे आहेत. पण यांकडे तुम्ही दुर्लक्ष केलं तर समस्या वाढू शकते. चला जाणून घेऊ पुरूषांना रात्री घाम येण्याची कारणे...
चिंता किंवा तणाव
जर तुम्हाला जीवनात काही चिंता असेल किंवा एखाद्या कारणाने तुम्ही तणावात असाल तर रात्री झोपताना तुम्हाला जास्त घाम येऊ शकतो. तेच जर तुम्ही कामादरम्यान जास्त स्ट्रेस घेत असाल किंवा एखाद्या गोष्टीचा सतत विचार करत असाल. तर तुम्हाला रात्री झोपताना घाम येऊ शकतो. अशात तुम्ही जास्त चिंता करणं सोडलं पाहिजे आणि तणावही कमी केला पाहिजे.
गॅस्ट्रोओसोफेगल रिफ्लक्स
रात्री झोपताना पुरूषांना जास्त घाम येण्याचं आणखी एक कारण म्हणजे जीइआरडी. यादरम्यान तुमच्या पोटात अॅसिड एसोफॅगस वाढू शकतं आणि जळजळ होऊ शकते. ज्यामुळे हृदयाची धडधड वाढू शकते. यामुळे तुम्हाला छातीत जळजळ, श्वास घेण्यास समस्या होऊ शकते. या कारणानेही तुम्हाला रात्री झोपेत असताना जास्त घाम येऊ शकतो.
टेस्टोस्टेरॉन कमी झाल्याने
टेस्टोस्टेरॉन हार्मोन कमी झाल्यानेही तुम्हाला रात्री झोपेत जास्त घाम येऊ शकतो. जसजसे आपण मोठे होत जातो शरीर कमी टेस्टोस्टेरॉनची निर्मिती करतं. ज्यामुळे टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे कधी कधी समस्या निर्माण होतात. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.