मुलांसाठी त्रास­­दायक ठरतो संसर्गजन्य 'डिप्थीरिया'; लक्षणं ओळखा, लगेच उपचार घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 01:00 PM2019-04-26T13:00:09+5:302019-04-26T13:00:34+5:30

डिप्थीरिया एक प्रकारचा इन्फेक्शन पसरवणारा आजार आहे. याची लागण साधारणतः लहान मुलांना पटकन होत असून मोठ्या माणसांनाही हा आजार होऊ शकतो. डिप्थीरिया कॉरीनेबॅक्टेरियम बॅक्टीरियाच्या इन्फेक्शनमुळे होतो.

These causes of diphtheria and know its symptoms | मुलांसाठी त्रास­­दायक ठरतो संसर्गजन्य 'डिप्थीरिया'; लक्षणं ओळखा, लगेच उपचार घ्या!

मुलांसाठी त्रास­­दायक ठरतो संसर्गजन्य 'डिप्थीरिया'; लक्षणं ओळखा, लगेच उपचार घ्या!

googlenewsNext

डिप्थीरिया एक प्रकारचा इन्फेक्शन पसरवणारा आजार आहे. याची लागण साधारणतः लहान मुलांना पटकन होत असून मोठ्या माणसांनाही हा आजार होऊ शकतो. डिप्थीरिया कॉरीनेबॅक्टेरियम बॅक्टीरियाच्या इन्फेक्शनमुळे होतो. हे विषाणू सर्वात आधी गळ्यामध्ये इन्फेक्शन पसरवतात. यामुळे श्वसननलिकेपर्यंत इन्फेक्शन पसरते. तसेच संक्रमण झालेल्या व्यक्तीला श्वास घेण्यासही त्रास होतो. डिप्थीरिया हा संसर्गजन्य रोग आहे. त्यामुळे याची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कामध्ये आल्याने लवकर हा रोग पसरतो. पण कधी कधी हा आजार शरीरासाठी अत्यंत घातक ठरू शकतो.

डिप्थीरियाची कारणं :

1. डिप्थीरिया एक संक्रमण पसरवणारा आजार आहे. डिप्थीरियाचे जीवाणु रूग्णांचं तोडं, नाक आणि गळ्यामध्ये राहतात. 

2. डिप्थीरिया एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत खोकल्यामुळे आणि शिंकल्यामुळे अगदी सहज पसरतो. 

3. पावसाळ्यामध्ये डिप्थीरिया सर्वात जास्त नुकसान पोहोचवतो. यावेळी या आजाराचे विषाणू सर्वात जास्त पसरतात. 

4. डिप्थीरियाची लक्षणं आढळून आल्यास त्याकडे दुर्लक्षं करून नये. जर तुम्ही याकडे दुर्लक्षं केलं तर विषाणू संपूर्ण शरीरामध्ये वेगाने पसरतात. 

लक्षणं :

1. डिप्थीरियाची लक्षणं संक्रमण झाल्यानंतर दोन ते पाच दिवसांमध्ये दिसून येतात. तसेच यामुळे त्वचेचा रंग निळसर दिसू लागतो. 

2. डिप्थीरियाची लागण झाल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होतो. याव्यतिरिक्त गळ्यामध्ये सूज येणं तसेच वेदना होणं यांसारख्या समस्यांचाही सामना करावा लागू शकतो. 

3. डिप्थीरियाची लागण झाल्यानंतर ताप येतो. तसचे याव्यतिरिक्त सतत अस्वस्थ जाणवू लागतं. 

4. डिप्थीरियाच्या संक्रमणामध्ये खोकला येतो. त्याचबरोबर सतत खोकला येतो. 

डिप्थीरियावर उपचार - 

डिप्थीरियाची लागण झालेल्या व्यक्तीच्या हातावर अॅन्टी-टॉक्सिन्सचे इन्जेक्शन दिलं जातं. ज्या व्यक्तीला हे इन्जेक्शन देण्यात येतं. यानंतर डॉक्टर अॅन्टी-एलर्जीची टेस्ट करून खात्री करतात की, रूग्णाची त्वचा अॅन्टी-टॉक्सनसाठी संवेदनशील तर नाही. दरम्यान, सुरूवातीमध्ये अॅन्टी-टॉक्सिन्स कमी प्रमाणात देण्यात येतात. परंतु हळूहळू याचे प्रमाण आवश्यकतेनुसार वाढवू शकतात. मुलांना नियमितपणे लसीकरण केल्यामुळे डिप्थीरियाच्या गंभीर परिणामांपासून त्यांची सुटका होते. तसेच लसीकरण केल्यामुळे डिप्थीरियाचा धोकाही कमी होतो. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणत्याही गोष्टीचा दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असतं. 

Web Title: These causes of diphtheria and know its symptoms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.