'या' कारणांमुळे होते मणक्याला दुखापत; अशी घ्या काळजी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 04:02 PM2019-04-12T16:02:43+5:302019-04-12T16:03:38+5:30
स्पाइनल कॉर्ड आपल्या शरीरामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण काम करतं. हे मेंदूपासून शरीराच्या इतर अवयवांपर्यंत संदेश पोहोचवण्याचं काम करतं. याव्यतिरिक्त स्पाइनल कॉर्ड लवचिक असते.
स्पाइनल कॉर्ड आपल्या शरीरामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण काम करतं. हे मेंदूपासून शरीराच्या इतर अवयवांपर्यंत संदेश पोहोचवण्याचं काम करतं. याव्यतिरिक्त स्पाइनल कॉर्ड लवचिक असते. ज्यामुळे आपल्याला हालचाल करणं, बसणं, उठणं यांसारख्या क्रिया करू शकतो. त्यामुळे स्पाइनल कॉर्डला दुखापत झाल्याने संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. शरीराची हालचाल करणंदेखील कठिण होतं. स्पाइनल कॉर्डचा सर्वात जास्त परिणाम हातांवर आणि पायांवर होतो. स्पाइनल कॉर्डला दुखापत झाल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. स्पाइनल कॉर्डचं ठिक राहणं आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतं. त्यामुळे स्पाइनल कॉर्ड एन्जुरीबाबत जाणून घेणं आवश्यक ठरतं. ज्यामुळे यापासून बचाव होऊ शकतो. असं मानलं जातं की, स्पाइनल कॉर्ड इन्जुरीचा धोका महिलांपेक्षा जास्त पुरूषांना असतं.
स्पाइनल कॉर्ड इन्जुरीची प्रमुख कारणं :
मणक्याच्या हाडांना लागणाऱ्या प्रकरणांमध्ये 82 टक्के पुरूषांचा समावेश आहे. तज्ज्ञांच्या मते आतापर्यंत हे समजू शकलेलं नाही की, असं होण्यामागे नक्की काय कारण आहे. परंतु, स्पाइनल कॉर्ड इन्जुरीचं प्रमाण महिलांपेक्षा जास्त पुरूषांमध्ये आढळून येतं.
1. स्पाइनल कॉर्ड इन्जुरीचं सर्वात मोठं कारण म्हणजे, रोड अॅक्सिडंट असतं. रोड अॅक्सिडंट दरम्यान स्पाइनल कॉर्डवर परिणाम होऊ शकतो.
2. खेळताना स्पाइनल कॉर्डला दुखापत होऊ शकते.
3. अर्थरायटिस, ऑस्टियोपोरोसिस, कॅन्सर आणि इतर इन्फेक्शन्समुळे स्पाइनल कॉर्ड इन्जुरी होऊ शकते.
4. कधी-कधी मस्तीमध्ये किंवा भांडणामध्ये स्पाइनल कॉर्डला दुखापत होते.
5. वृद्ध माणसांमध्ये स्पाइनल कॉर्ड इन्जुरी पडल्यामुळे होऊ शकते.
(Image Credit : Medscape)
इन्जुरीपासून बचाव करण्याचे उपाय :
1. फोर व्हिलर कार ड्राइव करताना सीट बेल्टचा प्रयोग करणं आवश्यक असतं. तेच टूव्हिलर चालवताना हेल्मेट वापरणं गरजेचं असतं.
2. कोणतंही वाहन मद्यधुंद अवस्थेत चालवू नये. याव्यतिरिक्त वाहनाच्या वेगावरही नियंत्रण ठेवणं गरजेचं असतं.
3. कमी पाणी असणाऱ्या ठिकाणी स्विमिंग करू नये.
4. शरीराला जास्त कष्ट करावे लागतील अशी काम करणं शक्यतो टाळावं.
5. खेळताना स्वतःची काळजी घेऊन खेळा.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणत्याही समस्येवर उपाय म्हणून तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.