उन्हाचा पारा वाढताच होतात हे 5 गंभीर आजार, जाणून घ्या कशी घ्याल काळजी!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 01:04 PM2024-03-23T13:04:27+5:302024-03-23T13:05:41+5:30
उन्हाळ्यात मुख्यपणे कोणत्या समस्या होतात याबाबत आणि काय काळजी घ्यावी हे आज आम्ही सांगणार आहोत.
तशा तर सगळ्याच ऋतुंमध्ये आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होत असतात. पण खासकरून उन्हाळ्यात अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळे उन्हाळ्यात आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागेत. जर दुर्लक्ष केलं तर महागात पडू शकतं. उन्हाळ्यात मुख्यपणे कोणत्या समस्या होतात याबाबत आणि काय काळजी घ्यावी हे आज आम्ही सांगणार आहोत.
1) डिहायड्रेशन
उन्हाळा म्हटलं की, सगळ्यात कॉमन समस्या म्हणजे डिहायड्रेशन. शरीरात पाण्याचं संतुलन योग्य प्रमाणात ठेवणं या दिवसात गरजेचं असतं. रोज जवळपास 8 ते 10 ग्लास पाणी पिणे प्यायला हवं. कमी पाणी पिणे आणि जास्त वेळ उन्हात राहणे यामुळे डिहायड्रेशनची समस्या होण्याची शक्यता अधिक असते. डिहायड्रेशनमुळे मेंदू, किडनी, मांसपेशी आणि ह्रदयाला नुकसान होऊ शकतं. चक्कर येणं, अशक्तपणा वाटणं आणि तहान लागणं ही डिहायड्रेशनची लक्षणे आहेत.
2) वायरल फीवर
जास्त ताप, अंगदुखी, घशात खवखव, सर्दी, डोकं दुखणे हे या रोगाची लक्षणं आहेत. हा त्रास तुम्हाला एक आठवडा होऊ शकतो. हा त्रास टाळण्यासाठी योग्य प्रमाणात हलक्या पदार्थांचं सेवन करणं गरजेचं आहे. सोबतच भरपूर पाणी प्यावं.
3) डायरिया
हा आजार या दिवसात बाहेरील पदार्थ खाल्ल्याने होण्याची शक्यता अधिक असते. पोटावर सूज येणे, पोट दुखणे, सतत टॉयलेटला जावं लागणे ही या आजाराची लक्षणे आहेत. या आजाराचे परीणाम अनेकदा गंभीर बघायला मिळतात. त्यामुळे कोणतीही रिस्क न घेता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक चांगले.
4) मायग्रेन
गरमीमुळे डोकेदुखी आणि मायग्रेन समस्या अधिक भेडसावू शकते. गरमीमुळे रक्तनलिका आकुंचन पावतात. त्यामुळे मेंदुला होणारा रक्त पुरवठा कमी होतो. यात डोकेदुखी समोरच्या बाजूने सुरू होऊन मागच्या बाजूपर्यंत जाते. जास्त वेळ उन्हात घालवल्याने ही समस्या अधिक जाणवते.
5) हेपेटायटिस ए म्हणजे काविळ
उन्हाळ्यात हा आजार फारच कॉमन आहे. ही समस्या दूषित पाणी आणि दूषित पदार्थ खाल्ल्याने होते. काविळ झाल्यावर रूग्णाचे डोळे आणि नखेही पिवळी होऊ लागतात. तसेच लघवीही पिवळ्या रंगाची होते. यावर वेळीच उपचार घेतले नाही तर जीवालाही धोका होऊ शकतो. काविळपासून बचाव करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे लिव्हर हेल्दी ठेवणं. जर काविळ बरा झाला तर काही महिने साधं म्हणजे खिचडी, दलिया खाण्याचा सल्ला दिला जातो.