'या' तेलांमध्ये दडलं आहे वजन कमी करण्याचं गुपित, तुमचा तणावही होईल दूर!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 12:12 PM2019-08-14T12:12:16+5:302019-08-14T12:12:54+5:30
पौष्टिक आहार आणि एक्सरसाइज करून शरीरातील अतिरिक्त फॅट म्हणजे चरबी कमी करणं हा एकमेव उपाय नाही.
पौष्टिक आहार आणि एक्सरसाइज करून शरीरातील अतिरिक्त फॅट म्हणजे चरबी कमी करणं हा एकमेव उपाय नाही. अशाही काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला वेग देऊ शकता. यातीलच एक म्हणजे अरोमाथेरपी. सायन्स सांगतं की, काही इसेंशिअल ऑइलचा वापर करून केवळ मूडच चांगला होतो असं नाही तर शरीराला ऊर्जा देखील मिळते. तसेच याने वजन कमी करण्यासही मदत मिळते.
(Image Credit : Social Media)
जर तुम्हाला इसेंशिअल ऑइलपासून काहीही समस्या नसेल तर याचा वापर करण्यास काहीच हरकत नाही. वजन कमी करण्यासाठी तुम्ही अनेकदा अनेक गोष्टींचा वापर केला असेल, पण हा प्रयोग वेगळा आणि प्रभावी ठरू शकतो.
इसेंशिअल ऑइलची खासियत
(Image Credit : cleanmyspace.com)
इसेंशिअल ऑइल कोणत्याही फुलांपासून, मसाल्यापासून तयार केले जातात आणि यात भरपूर शक्ती असते. डोकेदुखीपासून ते तणाव आणि डिप्रेशनपर्यंतच्या समस्या इसेंशिअल ऑइलने दूर केल्या जातात. सोबतच वजन कमी करण्यासही याने मदत मिळते. याची खासियत म्हणजे याचे काही थेंबच भरपूर फायदेशीर ठरतात. इसेंशिअल ऑइलच्या काही थेंबातच भरपूर शक्ती असते. चला जाणून घेऊ याचा वजन कमी करण्यात कसा होतो फायदा....
लेमन इसेंशिअल ऑइल
(Image Credit : www.verywellhealth.com)
लेमन इसेंशिअल ऑइल वजन कमी करण्यात फार प्रभावी ठरतं. या ऑइलने शरीरातील टॉक्सिन दूर केले जातात. ज्यामुळे शरीरातील ऊर्जेचा स्तर वाढतो. सोबतच याने पचन क्षमताही वाढते. काही रिसर्चमधून समोर आले आहे की, लेमन इसेंशिअल ऑइलचा सुगंध घेतल्याने तुमचा मूडही चांगला होतो आणि सोबतच याने शरीरातील चरबीही गळण्यास मदत मिळते.
लॅव्हेंडर इसेंशिअल ऑइल
लॅव्हेंडर इसेंशिअल ऑइल हे स्ट्रेस दूर करण्याचं उत्तम माध्यम आहे. याने तणाव कमी होतो आणि सोबतच या ऑइलच्या एका थेंबाने तुम्हाला चांगली झोपही येते. तसेच हे ऑइल वजन कमी करण्यातही तेवढंच फायदेशीर आहे.
तुमच्या हातावर लॅव्हेंडर इसेंशिअल ऑइलचे ४ ते ५ थेंब लावा आणि त्याचा सुगंध घेत रहा. तसेच घरातही हे जाळा. याचा जेवढा जास्त सुगंध तुम्ही घ्याल तेवढ्या जास्त कॅलरी तुम्ही बर्न कराल.
पेपरमिंट इंसेशिअल आणि जिंजर ऑइल
पेपरमिंट ऑइलने केवळ तुम्हाला केवळ ऊर्जा वाढवण्यासच नाही तर गळ्यातील मांसपेशी निरोगी ठेवण्यासही मदत मिळते. या ऑइलमुळे अनहेल्दी फूड खाण्याच्या तुमच्या लालसेला दूर केलं जातं. तुम्हाला याने आनंदी वाटेल. हे ऑइल तुम्ही आंघोळीच्या पाण्यातही टाकू शकता.
तर जिंजर ऑइलने शरीरातील सूज, तणाव करण्यासोबतच गोड पदार्थ खाण्याची लालसा रोखली जाते. सोबतच पचनक्रियाही मजबूत होते. हे ऑइल एक थर्मोजेनिक रूपात काम करतं, ज्याचा अर्थ हा होतो की, याने चरबी कमी करणे आणि मेटाबॉलिक रेट वाढवणे यात मदत मिळते. आंघोळीच्या पाण्यातून तुम्ही याचा वापर करू शकता.