कोरोनामध्ये सध्या ट्रेण्डिंग आहेत या एक्सरसाईज, ट्राय कराल तर व्हाल स्लीम ट्रिम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 07:45 PM2021-06-09T19:45:07+5:302021-06-09T19:46:13+5:30
कोरोना काळामध्ये लॉकडाऊन लागल्यामुळे अनेक जण घरातच आहेत. मग अशावेळी फिट राहण्यासाठी अनेकजण काही ना काही उपाय करत आहेत. काय आहेत सध्याचे ट्रेण्डिंग उपाय.
कोरोना काळामध्ये लॉकडाऊन लागल्यामुळे अनेक जण घरातच आहे. वर्कफ्रॉम होममुळे सतत कित्येक तास कम्प्युटरवर बसून आहेत. त्यामुळे अनेकांचे वजन वाढलेय आणि फीटनेसचे तर अक्षरश: बारा वाजलेत. मग अशावेळी फिट राहण्यासाठी अनेकजण काही ना काही उपाय करत आहेत. काय आहेत सध्याचे ट्रेण्डिंग उपाय.
योगासने
सध्या सर्वचजण ऑनलाईन योगा क्लासेसना हजेरी लावत आहेत. घरच्याघरी योगा शिकण्याचा उपाय बऱ्याचजणांच्या पसंतीस उतरला आहे. योगा क्लासेसमुळे जसे शरीर फिट अँड फाईन राहते तसा मानसिक तणावही दूर राहतो. मनाच्या स्वास्थ्यासाठीही योगा महत्वाचा आहे.
सोशल मिडिया, युट्युब डिजिटल फिटनेस ट्रेनिंग
सोशल मिडिया किंवा युट्यूबवर असे अनेक व्लॉग्स आहेत जिथे फिटनेसची माहीती दिली जाते तसेच एक्सरसाईजही शिकवल्या जातात. साध्या घरच्या घरी केल्या जाऊ शकणाऱ्या कार्डिओ एक्सरसाईज यात दाखवल्या जातात. तसेच या व्हिडिओचमुळे तुम्हाला व्यायाम करण्याचे मोटीवेशनही मिळते.
फिटनेस अॅप
सध्या तुम्हाला असे अनेक अॅप्स ऑनलाईन मिळतील जे तुम्हाला तुमच्या फिटनेसचा मंत्रा देतील. या अशा अॅप्समुळे तुम्हाला दैनंदिन डाएट प्लॅनही आखता येईल.
ऑनलाईन झुंबा क्लासेस
तुम्हाला डान्स करायला आवडत असेल तर ऑनलाईन झुंबा क्लासेस हा फीट राहण्याचा उत्तम पर्याय आहेत. यामध्ये तुम्ही आपली डान्सची आवड जोपासत फिटही राहु शकता.