हृदय निरोगी ठेवण्यासाठी 'या' गोष्टींची घ्या काळजी, कधीच हृदयरोगाचा होणार नाही धोका!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 09:49 AM2019-12-31T09:49:16+5:302019-12-31T09:56:45+5:30

देशातील हार्टसंबंधी रूग्णांची संख्या ६ कोटींपेक्षा अधिक आहे. इतकंच नाही तर ही संख्या हळूहळू वाढतच आहे.

These food will help you to take care of your heart | हृदय निरोगी ठेवण्यासाठी 'या' गोष्टींची घ्या काळजी, कधीच हृदयरोगाचा होणार नाही धोका!

हृदय निरोगी ठेवण्यासाठी 'या' गोष्टींची घ्या काळजी, कधीच हृदयरोगाचा होणार नाही धोका!

googlenewsNext

(Image Credit : rutherfordsource.com)

देशातील हार्टसंबंधी रूग्णांची संख्या ६ कोटींपेक्षा अधिक आहे. इतकंच नाही तर ही संख्या हळूहळू वाढतच आहे. अशात खाण्या-पिण्याच्या सवयींबाबत जागरूकता ठेवणं गरजेचं आहे. अनेकजण बदलत्या लाइफस्टाईलचे शिकार होत आहेत. म्हणजे लाइफस्टाईलमध्ये अशा काही चुकीच्या सवयी लावून घेतात की, त्यांना वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो. अलिकडे कमी वयातच हृदयरोगांचा सामना करावा लागत आहे. आणि याला कारण लोकांची बदलती लाइफस्टाईल, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, दुर्लक्ष करणे इत्यादी सांगता येतील. 

(Image Credit : thestar.com.my)

हृदय निरोगी ठेवणं फार गरजेचं झालं आहे. पण अनेकांना हे माहीत नसतं की, हृदय निरोगी कसं ठेवावं. तर आज आम्ही तुम्हाला हृदय निरोगी ठेवण्यासाठी काही खास आणि सोपे उपाय सांगणार आहोत. या उपायांच्या माध्यमातून तुम्ही पूर्णपणे तुमचं हृदय निरोगी ठेवू शकाल.

काय खावं?

- आरोग्य आणि हृदय चांगलं ठेवण्यासाठी सर्वात फायदेशीर ठरतात ती वेगवेगळी फळं आणि वेगवेगळ्या हिरव्या भाज्या. तसेच ड्राय फ्रूट्स, नट्स आणि सीड्स जसे की, बदाम, अक्रोड, पिस्ता, शेंगदाणे, कलिंगड इत्यादींच्या बीया आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

(Image Credit : parenting.firstcry.com)

- दूध, दही, ताक यानेही आरोग्य चांगलं राहतं. तसेच ग्रीन, ब्लॅक टी चं सेवन करूनही शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करू शकता. म्हणजेच याने हृदय निरोगी राहतं.

पाकिटातील पदार्थ ठेवा दूर

प्रोसेस्ड आणि प्रिजर्व्ड म्हणजे डब्यात बंद असलेले पदार्थ खाल्ल्याने आरोग्य खासकरून हृदयाला जास्त नुकसान होतं. 'रेडी टू इट' म्हणजे सेमी कुक्ड पदार्थ जसे की, भाज्या, बिर्याणी, पराठे, मिठाई इत्यादी तसेच पॅकेटमधील ज्यूस, सॉफ्ट ड्रिंक्स सुद्धा हृदयासाठी नुकसानकारक ठरतं.

(Image Credit : foodnavigator.com)

काय खाऊ नये?

- अनेकांना जेवणात वरून मीठ घेण्याची सवय असते. पण त्यांना हे माहीत नसतं की, त्यांची ही सवय त्यांच्यासाठी फार जास्त घातक आहे. तसेच वेगवेगळ्या फास्ट फूडमध्येही मिठाचं प्रमाण अधिक असतं. जास्त मिठामुळे हृदयाचं नुकसान होतं. त्यामुळे मीठ आणि साखरेचं सेवन कमीत कमी करा.

- जास्त कार्बोहायड्रेट्स असलेले पदार्थ कमी खावीत. फास्ट फूड आणि जंक फूड फार कमी खावेत. कारण मार्केटमधील हे पदार्थ फारच स्वस्त आणि खराब क्वालिटीच्या तेलात किंवा तूपात तयार केलेले असतात. याचा थेट प्रभाव हृदयावर पडतो. एकदा वापरलेलं तेल पुन्हा पुन्हा वापरलं जातं.

गोड काय खाऊ शकता?

पांढऱ्या साखरेऐवजी ब्राउन शुगरचा वापर करू शकता. तसेच नॉन-रिफाइंड गूळ सर्वात चांगला पर्याय आहे. बाजारात रिफाइंड गूळ जास्त मिळतो. पण हा गूळ आरोग्यासाठी नुकसानकारक आहे. नॉन-रिफाइंड गुळावर काळपटपणा आलेला असतो. पण आरोग्यासाठी हा गूळ सर्वात चांगला असतो.


Web Title: These food will help you to take care of your heart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.