पाइल्सच्या समस्येने असाल हैराण, तर डाएटसंबंधी या गोष्टी माहीत असायला हव्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 01:00 PM2022-06-22T13:00:57+5:302022-06-22T13:01:38+5:30
Worst Food In Piles- एनआयडीडीकेच्या रिसर्चनुसार, लूस मोशन झाले असताना ज्या पदार्थांमध्ये फायबरचं प्रमाण कमी असतं, ते टाळले पाहिजेत. पण या स्थितीत डाएट एक मुख्य भूमिका बजावते.
Worst Food In Piles- पाइल्सची समस्या अशी असते ज्यात व्यक्तीला बसण्यासही भिती वाटते. या स्थितीत लूस मोशनही होतात. जर ही लक्षण दिसत असतील तर तुम्हाला पाइल्स झाला आहे. या समस्येत विष्ठेतून रक्तही येतं. जर वेळीच यावर काही उपचार केले नाही तर स्थिती आणखीन बिघडू शकते. एनआयडीडीकेच्या रिसर्चनुसार, लूस मोशन झाले असताना ज्या पदार्थांमध्ये फायबरचं प्रमाण कमी असतं, ते टाळले पाहिजेत. पण या स्थितीत डाएट एक मुख्य भूमिका बजावते. या स्थितीत कोणते पदार्थ खावेत आणि कोणते पदार्थ टाळावे हे माहीत असलं पाहिजे.
तळलेले पदार्थ
तळलेले पदार्थ फार जास्त खाणं आरोग्यासाठी चांगले नसतात. याने पोटात इंफ्लेमेशन होऊ शकतं. हे पदार्थ फार हेवी असतात आणि पचायलाही वेळ लागतो. यामुळे डायडेस्टिव समस्या असणाऱ्या रूग्णांनीही हे पदार्थ खाणं टाळलं पाहिजे.
तिखट पदार्थ
पाइल्स झालेला असताना तिखट पदार्थ खाणं टाळलं पहिजे. याने टॉयलेटवेळी वेदना होऊ शकते. त्यामुळे जास्त तिखट पदार्थ खाऊ नये. याने आयबीएसची समस्याही जास्त वाढू शकते.
मद्यसेवन
मद्यसेवन केल्याने डायजेस्टिव सिस्टीम प्रभावित होते. याने पोटावर सगळा उलटा प्रभाव पडतो. याने पचनही उशीराने होते आणि बाउल मुव्हमेंटमध्येही समस्या होऊ लागते. याने वेदना जास्त होते.
कच्चे फळ खाऊ नये
जोपर्यंत फळं चांगले पिकत नाहीत तोपर्यंत त्यांचं सेवन करू नये. कच्च्या फळांमध्ये पोटाला इरिटेट करणारे कंपाउंड असतात, जे वेदना अधिक वाढवतात. त्यामुळे फळांचं सेवन केवळ तेव्हाच करावं जेव्हा ते चांगले पिकलेले असतात.
आयरनचे सप्लीमेंट
जर डाएटमध्ये आयरनचे सप्लीमेंट घेत असाल तर पाइल्स होण्याचा धोका आणखी जास्त वाढतो. औषधे, ड्रग्स आणि आयरनच्या सप्लीमेंटचं सेवन केल्याने पोटासंबंधी समस्या होते आणि आणखीही काही साइड इफेक्ट्स बघायला मिळतात.