हिवाळ्यात वेगाने रक्त होऊ लागतं घट्ट, गाठी तयार करणाऱ्या या गोष्टींपासून रहा दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 01:50 PM2023-01-12T13:50:55+5:302023-01-12T13:51:04+5:30
रक्त घट्ट होण्यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. हेल्थलाइननुसार, कॅन्सर, प्रोटीन सी आणि प्रोटीन एसची कमतरता, स्मोकिंग यांसारख्या कारणांमुळे रक्त घट्ट होऊ लागतं.
हिवाळ्यात सर्दी-खोकला होणं ही सामान्य बाब आहे. पण हिवाळ्यात जास्त थंडीमुळे रक्त घट्ट होण्याचा धोका अधिक असतो. या समस्येल हायपर कोएगुलेट एलिबिटी असं म्हटलं जातं. ज्यामुळे रक्तनलिकांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होऊ लागतात आणि रक्त कमी असल्याने पेशीही डॅमेज होऊ लागतात.
रक्त घट्ट होण्याची कारणे -
रक्त घट्ट होण्यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. हेल्थलाइननुसार, कॅन्सर, प्रोटीन सी आणि प्रोटीन एसची कमतरता, स्मोकिंग यांसारख्या कारणांमुळे रक्त घट्ट होऊ लागतं. अशात हिवाळ्यात रक्ताची खूप काळजी घ्यावी लागते. नाही तर समस्या गंभीर होऊ शकते.
Heart.org नुसार, कमी तापमान आणि थंडीमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे ब्लड प्रेशर हाय होऊ लागतं. त्याशिवाय जास्त थंडीमुळे रक्त घट्ट होतं. ज्यामुळे रक्ताच्या गाठीही तयार होतात.
रक्त घट्ट झाल्याची लक्षणे
हेल्थलाइननुसार, रक्त घट्ट झाल्याची लक्षणे तोपर्यंत दिसत नाहीत, जोपर्यंत शरीरात रक्ताच्या गाठी तयार होत नाहीत. ब्लड क्लॉटिंग सुरू झाल्यानंतर काही लक्षणे दिसू लागतात.
- धुसर दिसणे
- चक्कर येणे
- त्वचेवर निळे डाग पडणे
- पीरियड्समध्ये जास्त रक्त जाणे
- सांधेदुखी
- डोकेदुखी
- हाय ब्लड प्रेशर
- त्वचेवर खाज
- सतत थकवा येणे
- श्वास घेण्यास अडचण
रक्त घट्ट करतात व्हिटॅमिन्स
NCBI च्या रिपोर्टनुसार, व्हिटॅमिनची रक्ताच्या नॉर्मल क्लॉटिंग करण्यात महत्वाचे आहेत. पण कोणत्याही गोष्टी अतिवापर नुकसानकारक असतो. त्यामुळे जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशर किंवा रक्त घट्ट होण्याची समस्या असेल तर व्हिटॅमिन के असलेले पदार्थ जास्त खाऊ नये.
कशात असतं व्हिटॅमिन के
- केळी
- पालक
- ब्रॉकली
- सोयाबीन
- भोपळा
रक्त घट्ट होण्याची समस्या काही फूड्सच्या सेवनाने कंट्रोल केली जाऊ शकते. हळद, आले, लसूण, एलोवेरा आणि व्हिटॅमिन ई असलेले फूड्स. यात Anticoagulant गुण असतात जे रक्त पातळ ठेवण्यात मदत करतात. पण जर तुम्ही रक्त पातळ करण्यासाठी औषधांचं सेवन करत असाल तर काळजीही घेतली पाहिजे.