Antibiotics औषधांचा वाईट प्रभाव टाळण्यासाठी आहारात या गोष्टींचा करा समावेश!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 11:22 AM2024-08-02T11:22:10+5:302024-08-02T11:22:47+5:30
शरीर आतून मजबूत रहावं आणि कोणताही नकारात्मक प्रभाव पडू नये. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करू शकता.
वेगवेगळ्या आजारांवर उपचार करण्यासाठी आजकाल जास्तीत जास्त डॉक्टर अॅंटी-बायोटिक्स औषधे देतात. काही रूग्णांना तर अनेक दिवस ही औषध घ्यावी लागतात. ज्या लोकांना जास्त दिवसांसाठी अॅंटी-बायोटिक्सचं सेवन करावं लागतं त्यांच्या शरीरात वेगवेगळे साइड इफेक्ट्स दिसू लागतात. जसे की, त्यांना पोटाच्या वेगवेगळ्या समस्या होतात, इम्यून सिस्टीम कमजोर होतं आणि शरीरासाठी आवश्यक गुड बॅक्टेरियाही कमी होतात. अशा रूग्णांना आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. जेणेकरून शरीर आतून मजबूत रहावं आणि कोणताही नकारात्मक प्रभाव पडू नये. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करू शकता.
प्रोबायोटिक
दह्याचं सेवन केल्याने शरीराला वेगवेगळे फायदे मिळतात. कारण या प्रोबायोटिक्स म्हणजे गुड बॅक्टेरिया असतात जे आतड्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करतात. दह्याने पोट थंड राहतं. त्यामुळे तुम्ही दह्याचं सेवन नियमितपणे केलं तर अॅंटी-बायोटिक्सचं प्रभाव कमी करण्यास मदत मिळू शकेल.
फायबर
फायबरचं प्रमाण भरपूर असलेल्या पदार्थांचं सेवन केलं पाहिजे. अशात फायबर मिळवण्यासाठी तुम्ही केळी, ओट्स, कांदा, लसूण आणि बडीशेप यांचं सेवन वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. या गोष्टींमुळे शरीरात गुड बॅक्टेरिया वाढतात आणि पचन तंत्र चांगलं ठेवण्यास तुम्हाला मदत मिळेल.
हायड्रेशन
अॅंटी-बायोटिक औषधांचा कमी प्रभाव कमी करण्यासाठी शरीरात भरपूर पाणी असणं गरजेचं आहे. तसंही एकंदर आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी पिणं आवश्यक आहे. दिवसातून किमान २ ते ३ लीटर पाणी सेवन केलं पाहिजे.
हर्बल टी
हर्बल टी चं सेवन करूनही तुम्ही अॅंटी-बायोटिकचा प्रभाव कमी करू शकता. यासाठी तुम्ही लेमन टी, मिंट टी, जिंजर टी चं सेवन करू शकता. यात अॅंटी-ऑक्टिडेंट्स भरपूर असतात. जे फ्री रॅडिकल्सच्या वाईट प्रभावापासून आपला बचाव करतात.
व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स
शरीराचा वाईट प्रभावांपासून बचाव करण्यासाठी पोषक तत्व फार महत्वाचे ठरत असतात. यासाठी तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात व्हिटॅमिन सी चा समावेश करायला हवा. तुम्हाला व्हिटॅमिन सी संत्री, लिंबू, टोमॅटो आणि आवळे आणि वेगवेगळ्या बेरीजमधून मिळेल.