वजन घटवण्यासोबतच मन शांत ठेवतील 'हे' पदार्थ, जाणून घ्या अन् व्हा Fat to Fit!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 06:23 PM2021-06-13T18:23:29+5:302021-06-13T19:04:52+5:30
आपण काय खातो यावर आपले मानसिक स्वास्थ्य ही अवलंबून असते. काही अशा गोष्टी आहेत ज्या खाल्ल्यामुळे आपले आरोग्या तर उत्तम राहतेच पण आपले मानसिक स्वास्थ्यही चांगले राहते.
आपल्या शरीराचा आणि मनाचा फार जवळचा संबंध असतो. आपल्या शरीरात जे काही घडतं त्याचा थेट परिणाम आपल्या मनाच्या आरोग्यावर पडतो. त्यामुळे आपल्या जीवनशैलीकडे लक्ष देण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. आपण काय खातो यावर आपले मानसिक स्वास्थ्य ही अवलंबून असते. काही अशा गोष्टी आहेत ज्या खाल्ल्यामुळे आपले आरोग्या तर उत्तम राहतेच पण आपले मानसिक स्वास्थ्यही चांगले राहते.
उकडलेल्या भाज्या
भाज्या जास्त शिजवल्या तर त्यातील पोषकद्रव्ये नष्ट होतात तर अन्न कच्च खाल्ल्याने आपल्याला पोटदुखीसारखे विकार जडतात. त्यामुळे भाज्या जास्त शिजवूही नयेत तसेच त्या कच्च्याही खाऊ नयेत. योग्यप्रमाणात उकडलेल्या भाज्या खाल्ल्याने शरीराला त्याचा फायदाच होतो.
गरम मसाले वाटून खाणे
दालचिनी, मिरी, वेलची असे गरम मसाले वाटून जेवणात वापरल्याने आपल्याला त्याचा बराच फायदा होतो. या मसाल्यांमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पावसळ्यात किंवा थंडीत तुम्ही आलं, लसुणसारखे मसाले तव्यावर भाजून त्याचा जेवणात वापर करू शकता.
कोंड्यासकट गहु खावे
गहु कोंड्यासकट खाल्ल्याने त्याचा बराच फायदा होतो. गव्हामधील फायबर हे त्याच्या कोंड्यामध्ये असते. फायबर आपल्या शरीरातील चयापचय क्रिया सुरळीत ठेवते. त्यामुळे गव्हाचे पीठ कोंड्यासकटच वापरा.
थंड जेवण खाणे
थंड जेवण पचायला जड असतं तसेच त्यातील पोषक द्रव्ये नष्ट झालेली असतात. त्यामुळे थंड जेवण जेवू नका. तसेच आर्युवेदात असे सांगितले आहे की पोटभर जेवण जेऊ नका. त्यामुळे शरीराराला अपाय होतो. रात्री दोन घास कमीच खावेत.
गोड कमी खा
अति गोड खाणं अनेक रोगांना आमंत्रण देत. यामुळे डायबेटीस सारखे आजार होतात. गोड खाल्ल्याने वजनही वाढतं. त्यामुळे गोड प्रमाणातच खावे. तसेच तुम्ही साखरेऐवजी गुळ किंवा मधाचा वापर करू शकता.