अ‍ॅसिडीटी चटकन दूर करतील घरच्या घरी मिळणाऱ्या 'या' चार गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 11:27 PM2021-06-28T23:27:05+5:302021-06-28T23:37:59+5:30

पित्त, अपचन, अ‍ॅसिडीटी अशा समस्या अनेकांमध्ये सर्रास आढळतात. पण यावर वारंवार औषधे घेणे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरतील.

These four foods will reduce your acidity problem | अ‍ॅसिडीटी चटकन दूर करतील घरच्या घरी मिळणाऱ्या 'या' चार गोष्टी

अ‍ॅसिडीटी चटकन दूर करतील घरच्या घरी मिळणाऱ्या 'या' चार गोष्टी

Next

अ‍ॅसिडीटी, छातीतील जळजळ याचा अनुभव आपण सर्वांनीच घेतला आहे. याची अनेक कारणे आहेत. धावपळीची जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या वेळा, अनहेल्दी फूड, अपूर्ण झोप अशा अनेक कारणांमुळे अ‍ॅसिडीटी आणि अपचन होते. त्यामुळेच पित्त, अपचन, अ‍ॅसिडीटी अशा समस्या अनेकांमध्ये सर्रास आढळतात. पण यावर वारंवार औषधे घेणे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरतील. डाएट एक्सपर्ट रंजना सिंह यांनी झी न्युज हिंदीच्या संकेतस्थळाला सांगितलेले हे घरगुती उपाय अतिशय परिणामकारक आहेत. 
केळं
केळे पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. केळ्यात फायबर्स अधिक प्रमाणात असतात. अन्नपचनासाठी त्याचा फायदा होतो. केळ्यात पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असल्याने पोटात अॅसिड तयार होत नाही.
नारळ पाणी
नारळाचे पाणी प्यायल्यास शरीरातील अ‍ॅसिड घटकांचे अल्कलाईनमध्ये रुपांतर होण्यास मदत होते. परिणामी अ‍ॅसिडीटीचा त्रास शमवण्यास मदत होते. नारळाच्या पाण्यामध्ये फायबर घटक मुबलक प्रमाणात असल्याने  पित्ताचा त्रास उलटण्याची शक्यता कमी होते. तसेच पोटात थंडावा निर्माण झाल्याने जळजळ कमी होण्यासही मदत होते.
काकडी
काकडीमध्ये बऱ्याच प्रमाणात फायबर आणि पाण्याचं प्रमाण असतं. यामुळे पचनकार्य सुधारण्यास फार मदत होते. तसेच काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते. त्यामुळे काकडी अॅसिडीपासून तुमच्या शरीराला दूर ठेवते.
कलिंगड
कलिंगडामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. यामुळे चयापचयक्रिया सुरळीत पार पडते, जर तुम्ही कलिंगडाचे सेवन केलात तर अॅसिडिटीपासून तुम्हाला त्वरित आराम मिळेल. कलिंगड हा असा उपाय आहे ज्यामुळे तुम्हाला फायदाच होतो.

Web Title: These four foods will reduce your acidity problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.