डायबिटीसच्या रुग्णांनी स्पर्शही करु नका 'या' फळांना, सेवन केल्यास साखर प्रचंड वाढेल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 03:55 PM2022-08-16T15:55:58+5:302022-08-16T15:58:14+5:30

अशी कोणती फळे आहेत, जी मधुमेहाच्या रुग्णांनी खाल्ल्यास नुकसान होऊ शकते, त्याविषयी आज आपण जाणून (Harmful Fruits for Diabetic) घेऊया.

these fruits are dangerous for diabetes patient | डायबिटीसच्या रुग्णांनी स्पर्शही करु नका 'या' फळांना, सेवन केल्यास साखर प्रचंड वाढेल

डायबिटीसच्या रुग्णांनी स्पर्शही करु नका 'या' फळांना, सेवन केल्यास साखर प्रचंड वाढेल

googlenewsNext

फळे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानली जातात. फळांच्या सेवनाने शरीरातील अनेक खनिजे, फायबर, जीवनसत्त्वे यांची कमतरता पूर्ण होते. फळे खाल्ल्याने आपली पचनक्रियाही मजबूत राहते. निरोगी आहारासाठी, फळे देखील पुरेशा प्रमाणात खाणे आवश्यक आहे. मात्र, काही फळे मधुमेह असणाऱ्यांनी खायची नसतात, त्यांना फळांचा देखील त्रास होऊ शकतो. अशी कोणती फळे आहेत, जी मधुमेहाच्या रुग्णांनी खाल्ल्यास नुकसान होऊ शकते, त्याविषयी आज आपण जाणून (Harmful Fruits for Diabetic) घेऊया.

मधुमेहाच्या रुग्णांनी कोणती फळे खाणे टाळावीत -
MedicalNewsToday च्या माहितीनुसार ज्या फळांचा ग्लायसेमिक इंडेक्स 70 ते 100 च्या दरम्यान असतो, त्यात साखरेचे प्रमाण जास्त असते, जसे की टरबूज, केळी, पण शुगर असलेले लोकदेखील ही फळे खाऊ शकतात. मात्र, त्यांचे जास्त प्रमाणात सेवन करणे हानिकारक ठरू शकते. कोणते फळ खाता, तुम्ही किती प्रमाणात फळ खात आहात हे जास्त महत्त्वाचे आहे.

अननस -
अननसात साखरेचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे मधुमेही रुग्णांना अननसाचा ज्युस पिण्यास मनाई आहे. एक कप अननसाच्या रसामध्ये 14 ग्रॅम साखर असते, त्यामुळे ते टाळले पाहिजे. फार थोड्या प्रमाणात अननस खाऊ शकता, ज्युस नकोच.

आंबा टाळा -
साखरेच्या रुग्णांना गोड पदार्थ खाण्यास मनाई आहे किंवा खाणे टाळण्यास सांगितले जाते. मधुमेहाच्या रुग्णाने आंब्याचे सेवन करू नये, कारण एक कप आंब्यामध्ये सुमारे 23 ग्रॅम साखर असते, त्यामुळे हे फळ मधुमेहींसाठी त्रासदायक ठरू शकते.

चेरी नकोत -
चेरी खायला अनेकांना आवडतात, म्हणून ती आईस्क्रीम आणि केकमध्ये जास्त वापरली जातात. पण, अनेकांना माहीत नाही की, एक कप चेरीमध्ये सुमारे 20 ग्रॅम साखर असते. त्यामुळे साखर असलेल्या रुग्णांनी-मधुमेही रुग्णांनी चेरी खाणे टाळावे.

Web Title: these fruits are dangerous for diabetes patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.