उन्हाळ्यात चुकूनही फ्रिजमध्ये ठेवू नका ही फळं, फायदा कमी नुकसान होईल जास्त!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 11:50 AM2023-04-20T11:50:25+5:302023-04-20T11:50:37+5:30
fruits not kept in fridge: काही फळं अशीही असतात जी फ्रिजमध्ये अजिबात ठेवू नयेत. जर ही फळं तुम्ही फ्रिजमध्ये ठेवली तर ती 'विष' बनतात. त्यांचा फायदा कमी होईल नुकसान जास्त होईल.
fruits not kept in fridge: उन्हाळ्यात उष्णतेमुळे बऱ्याच गोष्टी खराब होऊ लागतात. अशात लोक फळं, भाज्या इतरही गोष्टी फ्रिजमध्ये ठेवतात. कारण त्यांना वाटतं की, या गोष्टी बाहेर ठेवल्या तर खराब होतील. यात काही तथ्यही आहे. पण काही फळं अशीही असतात जी फ्रिजमध्ये अजिबात ठेवू नयेत. जर ही फळं तुम्ही फ्रिजमध्ये ठेवली तर ती 'विष' बनतात. त्यांचा फायदा कमी होईल नुकसान जास्त होईल.
मार्थास्टिवर्ट डॉट कॉमवर प्रकाशित एका रिपोर्टनुसार, काही ताजी फळं फ्रिजमध्ये स्टोर करून ठेवणं आरोग्यासाठी नुकसानकारक आहे. जसे की, कलिंगड अजिबात फ्रिजमध्ये ठेवू नये. फ्रिजमध्ये कलिंगड ठेवल्याने हळूहळू त्यातील पोषक तत्व नष्ट होतात. जर कलिंगड कापून फ्रिजमध्ये ठेवलं तर त्याने फूड पॉयजनिंगही होऊ शकते. कारण कापलेल्या कलिंगडावर बॅक्टेरिया तयार होतात. जे आपल्या शरीरासाठी नुकसानकारक असतात.
लिंबू-संत्रीही दूर ठेवा
लिंबू आणि संत्रीमध्ये अॅसिडचं प्रमाण जास्त असतं. ही फळं फ्रिजच्या थंडाव्याला सहन करू शकत नाहीत. ही फळं फ्रिजमध्ये ठेवली तर त्यातील पोषक तत्व नष्ट होऊ लागतात. इतकंच नाही तर त्यांची टेस्टही बदलते. याने शरीराला नुकसान होऊ शकतं. त्यामुळे अशी फळं गरजेनुसार आणावी. जर फळं थंड करायची असेल तर थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवा आणि लगेच खा.
एका रिपोर्टनुसार, अॅवोकाडो, केळी, पेरू, कीवी, आंबे, कलिंगड, खरबूज, पपई, पेर, आलूबुखारा सारखी फळं फ्रिजमध्ये अजिबात ठेवू नयेत. कारण ही फळं सतत पिकण्याच्या प्रक्रियेत असतात. फ्रिजमध्ये ठेवल्यावर लगेच यातील पोषक तत्व नष्ट होतात. जर तुम्ही ही फळं फ्रिजमध्ये जास्त काळ स्टोर करून ठेवत असाल तर यातील अॅंटी-ऑक्सिडेंट गुणही कमी होतात आणि याने शरीराला नुकसानही होतं.