मेंदुला अॅक्टिव्ह ठेवण्यात फायदेशीर असतात तुमच्या या सवयी!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2018 11:02 AM2018-06-06T11:02:28+5:302018-06-06T11:02:28+5:30

सतत काहीतरी वेगळं करत राहणारे, काहीतरी क्रिएटीव्ह करत राहणाऱ्यांचा मेंदु सतत अॅक्टिव्ह राहतो. तुमच्या मेंदुला सतत अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगत आहोत. 

These good habits keep your brain active and healthy | मेंदुला अॅक्टिव्ह ठेवण्यात फायदेशीर असतात तुमच्या या सवयी!

मेंदुला अॅक्टिव्ह ठेवण्यात फायदेशीर असतात तुमच्या या सवयी!

Next

(Image Credit: www.theodysseyonline.com)

मुंबई : जर एखादी व्यक्ती टेंशनमध्ये असेल तर त्याचा त्यांच्या कामावर सरळ प्रभाव पडतो. पूर्णपणे फिट राहण्यासाठी तुमच्या डोक्यात सतत वेगवेगळे विचार यायला हवे. सोबतच तुमच्यात जिज्ञासु वृत्ति असायला हवी. सतत काहीतरी वेगळं करत राहणारे, काहीतरी क्रिएटीव्ह करत राहणाऱ्यांचा मेंदु सतत अॅक्टिव्ह राहतो. तुमच्या मेंदुला सतत अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगत आहोत. 

- ब्रेन गेम्स खेळा

अनेक शोधांमधून समोर आलं आहे की, मेंदुला निरोगी ठेवण्यासाठी ब्रेन गेम्सची महत्वपूर्ण भूमिका असते. गेम्स खेळताना मेंदुला आव्हान मिळतं. सुडोकू, बुद्धीबळ आणि रुबिक्स क्यूब सारखे तर्क शक्तीवर आधारित गेम्स मेंदुची विचार करण्याची गती आणि स्मरणशक्ती वाढवण्यात फायद्याचे ठरते. सोबतच याने मनोरंजनही होते. जर तुम्ही रोज अशाप्रकारचे गेम्स 15 ते 20 मिनिटे खेळात तर मेंदुसाठी याचा फायदा होईल. ही एकप्रकारची ब्रेन एक्सरसाईज आहे. 

- विपश्यना करा

आजच्या धावपळीच्या जीवनात वेळ काढणं तसं कठीण आहे. पण तरी थोडा वेळ काढून मेडिटेशन केल्यास मेंदुला फायदा होतो. डोकं शांत होण्यासोबतच याचा शारीरिक फायदाही तुम्हाला होतो. ज्या लोकांना झोप न येण्याची समस्या असेल त्यांनी मेडिटेशन आवर्जून करावं. 

- हेल्दी डाएट

मानसिक रुपाने निरोगी राहण्यासाठी तुम्ही कोणता आहार घेता हे महत्वाचे आहे. योग्य आहाराचे सेवन करणे तुमच्यासाठी फायद्याचे आहे. त्यामुळे पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असलेले पदार्थ अधिक खावे.

- मित्रांसोबत आपले अनुभव शेअर करा

आपले अनुभव मित्रांसोबत शेअर केल्याने तुमची स्मरणशक्ती वाढते. सोबतच कथा वाचण्याची सवयही तुम्हाला मानसिक स्वरुपाने फिट ठेवते. अनुभव शेअर केल्याने तुम्हाला चांगलंही वाटेल आणि तुमची स्मरणशक्तीही वाढेल. 

- व्यायाम करा

शारीरिक व्यायाम हाही एकप्रकारे मेंदुचाच व्यायाम आहे. व्यायाम करताना होणाऱ्या हालचालीचा प्रभाव थेट तुमच्या मेंदुच्या नसांवर पडतो. त्यामुळे नियमित व्यायाम गरजेचा आहे. 

- नवीन शिका

नव्या गोष्टी शिकूनही मेंदु फिट ठेवता येऊ शकतो. त्यामुळे सतत त्याच त्याच जुन्या गोष्टी न करता नवील काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मेंदुला नव्या गोष्टींचा विचार करण्यासाठी वेळ द्या. 
 

Web Title: These good habits keep your brain active and healthy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.