Health tips: 'या' सवयी हाड कमकुवत करतात, वेळीच बदला अन्यथा होतील गंभीर आजार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 12:54 PM2022-04-29T12:54:02+5:302022-04-29T12:58:22+5:30

लाईफस्टाईलमधल्या अशा अनेक सवयी असतात ज्यामुळे आपण आपली हाडं कमकुवत बनवतो. मग अशावेळी काय करावं? अशा सवयी बदलण्यासाठी आपण काय करावं हे आज आपण जाणून घेऊया.

these habits are responsible for weak bones know about them more | Health tips: 'या' सवयी हाड कमकुवत करतात, वेळीच बदला अन्यथा होतील गंभीर आजार

Health tips: 'या' सवयी हाड कमकुवत करतात, वेळीच बदला अन्यथा होतील गंभीर आजार

googlenewsNext

निरोगी जीवन जगण्यासाठी आपण काय काय नाही करत. पण हाडांचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी आपण काय करतो. आपल्या लाईफस्टाईलमधल्या अशा अनेक सवयी असतात ज्यामुळे आपण आपली हाडं कमकुवत बनवतो. मग अशावेळी काय करावं? अशा सवयी बदलण्यासाठी आपण काय करावं हे आज आपण जाणून घेऊया.

आळशी जीवनशैली
तुम्हाला कदाचित माहिती नसेल पण आळशी जीवनशैलीमुळे आपण हाडांचे नुकसान करून घेतो. आळस हा जीवनाचा शत्रु आहे असं म्हटलं जातं पण आळस हा कैकपटीने हाडांचा शत्रु आहे. हाडांच्या कमजोरीचे कारण बनणारा हा आळस झटकून जर आपण दररोज काही वेळ व्यायाम केला व काही मिनिट चाललो तर त्याचा फायदा होईल.

व्हिटामिन डी ची कमतरता
हाडांना व्हिटामिन डी ची अत्यंत गरज असते हे तुम्हाला माहित असेलच. शहरातील बंद घरांमुळे सुर्यप्रकाश घरात पोहोचत नाही. त्यामुळे हाडांना पुरेश्या प्रमाणात व्हिटामिन डी मिळत नाही. लहान मुलांमध्येही व्हिटामिनडीच्या कमतरतेमुळे अनेक हाडांचे त्रास होतात.  त्यामुळे सकाळी काहीकाळ सुर्यप्रकाशात जाणे फायद्याचे ठरेल.

पुरेशी झोप न घेणे
वेळी अवेळी झोप. पुरेशी झोप न घेणे हे हाडं कमजोर होण्यासाठी कारणीभूत आहे. तुम्ही किमान ७ ते ८ तास झोप घेणं आवश्यक आहे. जर तुम्ही त्यापेक्षा कमीवेळ झोप घेतल असाल तर त्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो.

मीठाचे अतिसेवन
मीठाचे अतिसेवन केल्याने हाडं कमजोर होतात. मीठामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. हाडांमधील कॅल्शियम कमी होण्यास ते कारणीभूत ठरते. त्यामुळे हाडं कमजोर होतात.

धुम्रपान
धुम्रपानामुळे फुफ्फुसांवर परिणाम होतो हे तुम्हाला माहिती असेल पण धुम्रपान केल्याने हाडांवरही परिणाम होतो. त्यामुळे धुम्रपान टाळा.

Web Title: these habits are responsible for weak bones know about them more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.