ऐकू येण्याची क्षमता कमी करू शकतात 'या' सवयी; कमी वयातच खराब होतील कान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 10:41 AM2020-05-24T10:41:54+5:302020-05-24T10:46:25+5:30

तुम्हाला माहितही नसेल पण अशा अनेक चुकीच्या सवयी आहेत. ज्यामुळे तुमच्या श्रवण क्षमतेवर वाईट परिणाम होतो. 

These habits can reduce your ability to hear, Ear damage myb | ऐकू येण्याची क्षमता कमी करू शकतात 'या' सवयी; कमी वयातच खराब होतील कान

ऐकू येण्याची क्षमता कमी करू शकतात 'या' सवयी; कमी वयातच खराब होतील कान

googlenewsNext

कानांचे कार्य हा आपल्या जीवनातील महत्वपूर्ण भाग आहे. जर काहीवे ळासाठी तुमचे कान बंद करण्यात आले तर काय होईल. याबाबत तुम्ही विचारही करू शकत नाही. जर एखाद्या व्यक्तीची ऐकण्याची क्षमता वयाच्या ४० ते ५०  या वयोगटात कमी झाली तर त्या व्यक्तीला अस्वस्थता वाटणं, चिडचिड होणं अशा समस्यांचा सामना करावा लागतो. तुम्हाला माहितही नसेल पण अशा अनेक चुकीच्या सवयी आहेत. ज्यामुळे तुमच्या श्रवण क्षमतेवर वाईट परिणाम होतो. 

धुम्रपान

सिगारेट ओढल्याने फक्त कॅन्सरचा आजार होत नाही तर तुम्ही कर्णबधीर सुद्धा होऊ शकता. सिगारेट ओढण्याचा कानांशी संबंध आहे.  सिगारेटमध्ये अनेक विषारी घटक असतात. जे फुफ्फुसांमध्ये जमा होतात.  याद्वारे रक्तातसुद्धा हे घटक मिसळतात. त्यामुळे शरीरातील संपूर्ण अवयवांना नुकसान पोहोचतं.  कानांचे अंतर्गत अवयव आणि पेशी खूपच नाजूक असतात. त्यामुळे विषारी पदार्थांच्या संपर्कात आल्यामुळे कानांची कार्यक्षमता कमी होते.  यावर उपाय म्हणून धुम्रपान न करणं फायदेशीर ठरेल. याशिवाय मदयपानामुळे सुद्धा कानांवर परिणाम होतो. दुय्यम दर्जाच्या मद्याचे सेवन केल्यास ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते. 

जास्त आवाजाचं वातावरण

कानांची आवाज ऐकण्याची सुद्धा एक क्षमता असते. कानांच्या पडद्यात व्हायब्रेशन ऐकू येतं.  तुम्ही जास्त आवाजाच्या वातावरणात राहत असाल किंवा जास्त मोठ्या आवाजाने गाणी ऐकत असाल तर तुमचे कान लवकर खराब होऊ शकतात. त्यासाठी हेडफोन लावल्यास कमी आवाजात गाणी ऐका.

 तोंडाच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणं

तोंडातील बॅक्टेरिअल इंन्फेक्शनची समस्या  कांनासाठी धोकादायक ठरू शकतं.  तोंडातील इन्फेक्शन कडे दुर्लक्ष केल्यास हे बॅक्टेरिया रक्तात मिसळतात. बॅक्टेरिया धमन्यांच्या सूजेचे कारण ठरू शकतात. कानांच्या पेशी या खूप संवेदनशील असतात. म्हणून तोंडातील समस्यांकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

CoronaVirus : कोरोनाच्या संक्रमणामुळे वाढत आहे 'या' सायलेंट किलर आजाराचा धोका; तज्ज्ञांचा दावा

Coronavirus : 'ज्या' गोष्टीमुळे दिलासा मिळण्याची होती सर्वात जास्त आशा, त्यासंबंधी निराशाजनक माहिती आली समोर!

Web Title: These habits can reduce your ability to hear, Ear damage myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.