काही लोकांसाठी ग्रीन टी चं सेवन पडू शकतं महागात, जाणून घ्या कुणी पिऊ नये!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 11:07 AM2024-08-08T11:07:55+5:302024-08-08T11:33:21+5:30

Green Tea Side Effects : काही लोकांसाठी ग्रीन टी पिणं फार नुकसानकारक ठरू शकतं. कुणी ग्रीन टी चं सेवन करू नये हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

These people do not drink green tea know the side effects | काही लोकांसाठी ग्रीन टी चं सेवन पडू शकतं महागात, जाणून घ्या कुणी पिऊ नये!

काही लोकांसाठी ग्रीन टी चं सेवन पडू शकतं महागात, जाणून घ्या कुणी पिऊ नये!

Green Tea Side Effects : ग्रीन टी चं सेवन आजकाल भरपूर लोक करतात. वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेले लोक तर केवळ ग्रीन टी चं सेवन करतात. तसेच याचे आरोग्यालाही अनेक फायदे होतात. ग्रीन टी मध्ये असे काही तत्व असतात जे मेटाबॉलिज्म बूस्ट करतात. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते आणि आपल्या आतड्यांचं आरोग्यही चांगलं राहतं. पण काही लोकांसाठी ग्रीन टी पिणं फार नुकसानकारक ठरू शकतं. कुणी ग्रीन टी चं सेवन करू नये हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

एक्सपर्ट्सनुसार, एका दिवसात २ ते ३ कप ग्रीन टी प्यायल्याने नुकसान होत नाही. पण जर एखादी व्यक्ती यापेक्षा ग्रीन टीचं सेवन करत असेल तर याचे साइड-इफेक्ट्स व्यक्तीमधे दिसू लागतात.

लिव्हरचं होतं नुकसान

काही दिवसांपूर्वी एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले होते की, जास्त ग्रीन टी प्यायल्याने लिव्हरचं नुकसान होतं. ग्रीन टीचं अधिक सेवन केल्याने लिव्हरच्या कार्यप्रणालीत गडबड होऊ शकते. लिव्हरला काम करण्यात समस्या येते. याने लिव्हरशी संबंधित समस्या आणि इन्फेक्शन होऊ शकतं.

एनिमियाचं कारण ठरू शकते ग्रीन टी

जेवणातून मिळणारं आयर्न शरीरात हीमोग्लोबिन वाढवण्याचं काम करतं. आयर्नच्या कमतरतेमुळे एनिमिया म्हणजेच शरीरात रक्ताची कमतरता होऊ शकते. वेगवेगळ्या रिसर्चमधून हे सांगण्यात आलं आहे की, ग्रीन टी च्या अधिक सेवनाने रक्ताची कमतरता येते. 

गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिला

ग्रीन टी मध्ये कॅफीनचं प्रमाण जास्त असतं, जे गर्भावस्था आणि स्तनपान दरम्यान नुकसानकारक ठरू शकतं. सामान्यपणे अशा महिलांना रोज कॅफीनचं सेवन २०० ते ३०० मिलीग्रॅमपेक्षा कमी करण्याचा सल्ला दिला जातो. जे सरासरी २ ते ३ कप ग्रीन टी च्या बरोबरीत असतं.

औषधं घेणारे व्यक्ती

जे लोक रक्त पातळ करण्याचं औषध घेत असतील त्यांनी ग्रीन टी चं सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच जे लोक अॅंटी-बायोटिक्स, हृदयासंबंधी औषधं आणि ब्लड प्रेशरची औषधं घेत असतील त्यांनीही ग्रीन टी चं सेवन करू नये.

चिंता आणि ड्रिपेशन असलेले लोक

ग्रीन टी मध्ये कॅफीनचं प्रमाण जास्त असल्याने डिप्रेशन असलेल्या लोकांची चिंता वाढवू शकते किंवा त्यांना अस्वस्थता जाणवू शकते. खासकरून रात्रीच्या वेळी ग्रीन टी चं सेवन करू नये.

Web Title: These people do not drink green tea know the side effects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.