'या' लोकांनी चुकूनही करू नये मूग डाळीचं सेवन, जाणून घ्या कारण..
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 10:21 AM2023-04-27T10:21:23+5:302023-04-27T10:21:39+5:30
Side Effects Of Moong Dal: काही लोकांसाठी मूग डाळीचं सेवन करणं नुकसानकारक ठरू शकतं. अशात आम्ही सांगणार आहोत की, कोणत्या लोकांनी मूग डाळीचं सेवन करू नये.
Side Effects Of Moong Dal: मूग डाळ आपल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर असते. कारण मूगाच्या डाळीमध्ये अनेक पोषक तत्व असतात. मूग डाळीमध्ये फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन, कॉपरसारखे पोषक तत्व आढळतात जे ब्लड शुगर कंट्रोल करण्यास मदत करतात. पण काही लोकांसाठी मूग डाळीचं सेवन करणं नुकसानकारक ठरू शकतं. अशात आम्ही सांगणार आहोत की, कोणत्या लोकांनी मूग डाळीचं सेवन करू नये.
लो ब्लड शुगर -
ज्या लोकांना लो ब्लड शुगरची समस्या आहे त्यांनी मूग डाळीचं सेवन करू नये. कारण मूग डाळीमध्ये असे काही तत्व असतात जे ब्लड शुगर कमी करण्याच्या कामी येतात, अशात जर तुम्ही मूग डाळीचं सेवन करता तेव्हा समस्या वाढू शकते.
स्टोन -
किडनी स्टोनची समस्या असणाऱ्या रूग्णांनी आपल्या आहाराबाबत खूप काळजी घेतली पाहिजे. अशात तुम्ही मूग डाळीचं सेवन करू नये. याचं कारण किडनी स्टोनमध्ये मूग डाळीचं करणं नुकसानकारक ठरतं. कारण यात प्रोटीन आणि ऑक्सलेटचं प्रमाण भरपूर असतं.
यूरिक अॅसिड -
हाय यूरिक अॅसिडच्या रूग्णांनी मूग डाळीचं सेवन करणं टाळलं पाहिजे. याचं कारण यात प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं. ज्यामुळे तुमच्या शरीरात यूरिक अॅसिडची लेव्हल वाढू शकते. त्यामुळे तुम्हाला जर यूरिक अॅसिडची समस्या असेल तर मूग डाळीचं सेवन करू नये.