मूग डाळीचं सेवन करणं काही लोकांसाठी ठरतं नुकसानकारक, जाणून घ्या कुणी खाऊ नये!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 06:13 PM2022-07-30T18:13:23+5:302022-07-30T18:13:43+5:30

Healthy Tips: आरोग्यांसंबंधी समस्या असणाऱ्या लोकांना मूगडाळ न खाण्याचा सल्ला दिला जातो. चला जाणून घेऊ की, अनेक आरोग्यदायी गुण असूनही ही डाळ कोणत्या लोकांसाठी नुकसानकारक ठरू शकते.

These people should not eat moong dal and moong dal side effects | मूग डाळीचं सेवन करणं काही लोकांसाठी ठरतं नुकसानकारक, जाणून घ्या कुणी खाऊ नये!

मूग डाळीचं सेवन करणं काही लोकांसाठी ठरतं नुकसानकारक, जाणून घ्या कुणी खाऊ नये!

googlenewsNext

Healthy Tips: सामान्यपणे सगळ्याच डाळी या आरोग्यासाठी चांगल्या मानल्या जातात आणि सर्वच डाळी खाल्ल्या जातात. पण मूगडाळीबाबत जरा वेगळं आहे. स्प्राउट्स किंवा भाजीच्या रूपात खाल्ली जाणारी ही मूगडाळ काही लोकांसाठी पूर्णपणे चांगली म्हणता येणार नाही. आरोग्यांसंबंधी समस्या असणाऱ्या लोकांना मूगडाळ न खाण्याचा सल्ला दिला जातो. चला जाणून घेऊ की, अनेक आरोग्यदायी गुण असूनही ही डाळ कोणत्या लोकांसाठी नुकसानकारक ठरू शकते.

यूरिक अ‍ॅसिड

ज्या लोकांमध्ये यूरिक अ‍ॅसिडचं प्रमाण जास्त असतं त्यांनी मूग डाळीचं सेवन करणं टाळलं पाहिजे. कारण याने शरीरात यूरिक अ‍ॅसिडचं प्रमाण वाढतं. त्यामुळे यूरिक अ‍ॅसिडच्या आहारातून मूग डाळीचा काढलं पाहिजे.  

पोट फुगणं

जेव्हा पोट फुगत असेल किंवा ब्लोटिंगची समस्या होत असेल तर मूग डाळ खाणं टाळलं पाहिजे. शॉर्ट चेन कार्ब्स असल्याने अनेक लोकांनी ही डाळ पचवण्यात समस्या होते. अशात पोटाच्या समस्या अधिक जास्त वाढू शकतात.

लो ब्लड प्रेशर

ज्या लोकांना हाय ब्लड प्रेशरची समस्या असते त्यांना सामान्यपणे मूग डाळ खाण्याचा सल्ला दिला जातो. पण ज्यांना लो ब्लड प्रेशरची समस्या असते त्यांनी मूग डाळ खाणं टाळलं पाहिजे. 

लो ब्लड शुगर

ज्या लोकांच्या शरीरात शुगर आधीच कमी असेल आणि चक्कर येणे किंवा कमजोरीसारखी लक्षणं दिसत असतील तर त्यांनी मूग डाळ खाऊ नये. याने ब्लड शुगर लेव्हल कमी होते. त्यामुळे ज्यांना आधीच लो ब्लड शुगरची समस्या असेल त्यांच्यासाठी ही डाळ नुकसानकारक ठरू शकते.

Web Title: These people should not eat moong dal and moong dal side effects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.