'या' उपायांनी शरीराच्या अनेक व्याधींपासून सुटका करणं शक्य!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 05:58 PM2018-10-29T17:58:23+5:302018-10-29T17:58:40+5:30
अनेकदा आपल्याला अंगदुखी, गुडघेदुखी यांसारख्या समस्या उद्भवतात. सततच्या त्रासामुळे कामामध्ये मन लागत नाही. अनेकदा यामागे आपल्याकडून दैनंदिन जीवनामध्ये होणाऱ्या चुकांचा परिणाम असतो.
अनेकदा आपल्याला अंगदुखी, गुडघेदुखी यांसारख्या समस्या उद्भवतात. सततच्या त्रासामुळे कामामध्ये मन लागत नाही. अनेकदा यामागे आपल्याकडून दैनंदिन जीवनामध्ये होणाऱ्या चुकांचा परिणाम असतो. पंरतु हे दुखणं जर जास्त त्रास देत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या नाहीतर कधीकधी या साध्या वाटणाऱ्या समस्यांचं गंभीर समस्यांमध्ये रूपांतर होऊ शकतं.
आपल्या जगण्यासाठी पाणी अत्यावश्यक आहे. पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकले जातात. काही लोक फ्रिजमधील थंड पाणी पितात. ज्यामुळे तुमच्या शरीराला फायद्यांऐवजी नुकसान होतं. जास्त थंड पाणी प्यायल्याने आतडी सुकून जातात. त्यामुळे साधं पाणी पिणं शरीरासाठी फायदेशीर ठरतं.
कडूलिंबाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. कडुलिंबाची पानं खाल्याने शरीरातील रक्त शुद्ध होतं. यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.
अनेकदा धुळ आणि मातीचे बारिक कण डोळ्यांमध्ये जातात आणि त्यामुळे इन्फेक्शन होते. हे इन्फेक्शन दूर करण्यासाठी पायाच्या अंगठ्याला मोहरीचं तेल लावा. आराम मिळेल.
ज्या व्यक्ती गुडघेदुखीच्या त्रासने त्रस्त आहेत त्यांना पाणी पिण्याच्या पद्धतीवर लक्ष देणं गरजेचं आहे. उभं राहून पाणी प्यायल्यानंतर गुडघेदुखीची समस्या होते. त्यामुळे पाणी नेहमी बसून पिणं गरजेचं असतं.
तुळशीमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असतात. त्यामुळे तुळशीची पानं अनोशापोटी खाल्याने मलेरियासारख्या गंभीर आजारापासून बचाव होतो.