शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यावर नखांवर दिसतात हे संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 11:32 AM2022-11-18T11:32:23+5:302022-11-18T11:32:38+5:30
High Cholesterol Symptoms: शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढलं तर तुमच्या नखांवर काही लक्षण दिसू लागतात. ज्याकडे तुम्ही चुकूनही दुर्लक्ष करू नये.
High Cholesterol Symptoms: आजकाल लोकांची लाइफस्टाईल खूप बदलत चालली आहे. ज्यामुळे लोक अनेक आजारांचे शिकार होतात. तेच खराब लाइफस्टाईलमुळे कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे लोकांना लठ्ठपणा, हाय ब्लड प्रेशरचा धोकाही वाढतो. शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढलं तर तुमच्या नखांवर काही लक्षण दिसू लागतात. ज्याकडे तुम्ही चुकूनही दुर्लक्ष करू नये. अशात तुम्हाला माहीत असलं पाहिजे की, कोलेस्ट्रॉल वाढल्याने नखांवर कोणती लक्षणं दिसतात.
नखांचा रंग पिवळा होणं
शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्याने तुमच्या नखांचा रंग पिवळा होतो. यावरून शरीरात ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित होत नसल्याचं दिसून येतं. याच कारणामुळे नखांचा रंग पिवळा होतो. तसेच नखांमध्ये भेगाही पडू लागतात. इतकंच नाही तर नखांची वाढही थांबते.
हातांमध्ये वेदना
शरीरात जसं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं तेव्हा हातांच्या रक्तवाहिका बंद होऊ शकतात. ज्यामुळे हातांमध्ये वेदना होते. त्यामुळे तुम्हाला हातांमध्ये वेदना होत असेल तर दुर्लक्ष अजिबात करू नका.
हातांमध्ये झिणझिण्या
शरीरातील काही भागांमध्ये रक्तप्रवाह थांबला तर हातांमध्ये झिणझिण्या येऊ शकतात. हाय कोलेस्ट्रोल आणि लठ्ठपणामुळे रक्तप्रवाह बरोबर होत नाही. त्यामुळे हातांमध्ये झिणझिण्या येऊ शकतात.