जर नखांवर दिसत असतील हे संकेत, तर वेळीच व्हा सावध; आरोग्याचं होऊ शकतं मोठं नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 05:12 PM2022-07-19T17:12:36+5:302022-07-19T17:12:51+5:30
Nail health : आपल्या शरीरातील काही असे अवयव आहेत ज्यांमध्ये काही बदल झाला तर काही संकेत दिसून येतात. नखंही त्यातील एक आहे. जर नखांमध्ये काही बदल दिसला तर समजून घ्या की, तुम्ही एखाद्या आजाराचे शिकार झाले आहात.
Nail health : आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव हा महत्वाचा आहे. प्रत्येक अवयव एकमेकांना कनेक्टेड आहे. त्यामुळे जेव्हा एकात गडबड होते तेव्हा पूर्ण शरीराचं सिस्टीम प्रभावित होतं. आपल्या शरीरातील काही असे अवयव आहेत ज्यांमध्ये काही बदल झाला तर काही संकेत दिसून येतात. नखंही त्यातील एक आहे. जर नखांमध्ये काही बदल दिसला तर समजून घ्या की, तुम्ही एखाद्या आजाराचे शिकार झाले आहात.
पिवळी नखं
नखांच्या आजूबाजूला त्वचा पिवळी झाली तर हा थायरॉइडचा संकेत असू शकतो. त्यासोबतच नखं तुटणं, त्याला फाटे फुटणं, कोरडे होणं, बोटांवर सूज येणं हेही या आजाराचे संकेत आहेत.
नखांवर लाइन्स
नखांवर रेषा दिसू लागल्या तर मेलेनोमा सारख्या आजाराचा संकेत आहे. हा नखांच्या आजूबाजूच्या त्वचेत होणारा कॅन्सर असतो. हा पायांच्या नखांवरही होऊ शकतो. अशात हे लक्षण दिसू लागलं तर वेळीच डॉक्टरांना संपर्क करा. याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
पिटिंग नेल्स
पिटिंग नेल सोरायसिससारख्या आजाराचं लक्षण असतं. यात नखं तुटणं आणि यात छिद्र पडणं हेही होतं. सोबतच नखं फार जास्त टोकदार होतात. अशी स्थिती दिसली तर वेळीच अलर्ट व्हा आणि डॉक्टरांना संपर्क करा.
नखांवर आडव्या रेषा
नखांवर हॉरिझॉंटल लाइन किडनी किंवा थायरॉइडच्या समस्येकडे इशारा करतात. त्यासोबतच निमोनिया, जास्त ताप याचंही हे लक्षण आहे. फार जाड आणि पिवळी नखं डायबिटीसची लक्षणं आहेत.