रक्तात Uric Acid वाढल्यावर पायांवर दिसतात हे ५ संकेत, सोबतच जाणून घ्या याची कारणे!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 12:03 PM2024-11-21T12:03:13+5:302024-11-21T12:10:49+5:30

High Uric Acid Symptoms in Feet : जास्तीत जास्त यूरिक अ‍ॅसिड रक्तात मिक्स होतं आणि किडनीमध्ये पोहोचून लघवीद्वारे बाहेर निघतं. पण जर किडनीने योग्यपणे काम केलं नाही तर या स्थितीत रक्तात जास्त यूरिक अ‍ॅसिड जमा होऊ लागतं. 

These symptoms seen in feet indicate high uric acid | रक्तात Uric Acid वाढल्यावर पायांवर दिसतात हे ५ संकेत, सोबतच जाणून घ्या याची कारणे!

रक्तात Uric Acid वाढल्यावर पायांवर दिसतात हे ५ संकेत, सोबतच जाणून घ्या याची कारणे!

High Uric Acid Symptoms in Feet : यूरिक अ‍ॅसिड एक असं केमिकल आहे जे शरीर प्यूरीन नावाचा पदार्थ तोडतं. प्यूरीन शरीरात तयार होतं. तसेच काही खाद्य पदार्थ आणि ड्रिंक्समध्येही असतं. प्यूरीन अधिक प्रमाणात मॅकेरल, बीन्स, मटर आणि बिअरमध्ये आढळतं. जास्तीत जास्त यूरिक अ‍ॅसिड रक्तात मिक्स होतं आणि किडनीमध्ये पोहोचून लघवीद्वारे बाहेर निघतं. पण जर किडनीने योग्यपणे काम केलं नाही तर या स्थितीत रक्तात जास्त यूरिक अ‍ॅसिड जमा होऊ लागतं. 

रक्तात जास्त यूरिक अ‍ॅसिड जमा होण्याला हायपरयूरिसीमिया म्हटलं जातं. या स्थितीत शरीरात वेगवेगळे संकेत दिसतात. ज्यातील काही संकेत पायांच्या आजूबाजूलाही दिसतात. अशात यांकडे दुर्लक्ष करणं किंवा त्यांना सामान्य समजणं महागात पडू शकतं. अशात यूरिक अ‍ॅसिड वाढल्यावर पायांवर काय संकेत दिसतात ते आम्ही सांगणार आहोत.

यूरिक अ‍ॅसिड वाढवणाऱ्या सवयी

प्यूरिन फूड्स जास्त खाणं

जास्त अल्कोहोलचं सेवन

हाय फॅट असलेले फूड खाणं

गोड पदार्थ जास्त खाणं

मिठाचं जास्त सेवन करणं

यूरिक अ‍ॅसिड वाढल्याचे संकेत

पायांमध्ये जळजळ

पायांच्या जळजळ होणे शरीरात यूरिक अ‍ॅसिडचं प्रमाण वाढल्याचा इशारा आहे. या स्थिती गाउट नावाने ओळखलं जातं. जॉइंट्समध्ये यूरिक अ‍ॅसिड जमा होण्यासाठी हा एक कॉमन शब्द आहे. ही स्थिती सामान्यपणे पायांना प्रभावित करते, ज्यामुळे पायांमध्ये जळजळ होऊ लागते.

टाचांमध्ये वेदना

जेव्हा शरीरात यूरिक अ‍ॅसिड अधिक प्रमाणात जमा होतं तेव्हा टाचांमध्ये वेदना होऊ लागतात. ही स्थिती अनेकांमध्ये सामान्यपणे बघायला मिळते. जर तुम्हालाही असे काही संकेत दिसत असतील तर वेळीच डॉक्टरांना दाखवा.

पायांवर सूज

शरीरात यूरिक अ‍ॅसिड हाय झालं तर पायांच्या आजूबाजूला जास्त सूज बघायला मिळते. अशात पायांमध्ये वेदना आणि स्पर्श केल्यास जळजळ जाणवू शकते. जर तुम्हाला असे काही संकेत दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

अंगठ्याजवळ वेदना

रक्तात यूरिक अ‍ॅसिडचं प्रमाण जास्त वाढल्यावर पायाच्या अंगठ्याजवळ खूप वेदना होतात आणि सूजही येते. तसेच अंगठ्याच्या आजूबाजूला लालसरही दिसतं. याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

पायांमध्ये टोचल्यासारखं वाटणे

हाय यूरिक अ‍ॅसिडची समस्या असलेल्या लोकांच्या पायांमध्ये खासकरून अंगठे आणि टाचांमध्ये टोचल्यासारखं जाणवतं. जर तुम्हालाही असं काही होत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन, योग्य ते उपचार घ्यावे.

Web Title: These symptoms seen in feet indicate high uric acid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.