हृदयाला छिद्र असेल तर शरीरावर दिसतात ही लक्षणे, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 09:13 AM2022-09-17T09:13:54+5:302022-09-17T09:14:18+5:30

Hole In Heart Symptoms: वेळीच हृदयाला छिद्र असण्याच्या समस्येची लक्षणे ओळखली तर उपचार केले जाऊ शकतात. अशात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, हृदयाला छिद्र असेल तर शरीरावर कोणते संकेत दिसतात?

These symptoms seen when there is a hole in the heart | हृदयाला छिद्र असेल तर शरीरावर दिसतात ही लक्षणे, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

हृदयाला छिद्र असेल तर शरीरावर दिसतात ही लक्षणे, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

googlenewsNext

Hole In Heart Symptoms: आजकाल हृदयासंबंधी आजार फार वेगाने वाढत आहे. पण लोकांना माहिती नसल्याने लोक वेळेवर याची ओळख पटवू शकत नाही आणि आजार आणखी गंभीर घेतो. हृदयाशी संबंधित एक गंभीर समस्या म्हणजे हृदयाला छिद्र असणे. ही समस्या जन्मजात असते. पण वेळीच हृदयाला छिद्र असण्याच्या समस्येची लक्षणे ओळखली तर उपचार केले जाऊ शकतात. अशात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, हृदयाला छिद्र असेल तर शरीरावर कोणते संकेत दिसतात?

1) हृदयाला छिद्र असेल तर उन्हाळ्यात थंडी वाजत असेल तर हा हृदयाला छिद्र असण्याचा संकेत आहे. तुम्हालाही उन्हाळ्यात थंडी वाजत असेल किंवा तुमचं शरीर नेहमीच थंड राहत असेल तर डॉक्टरांशी नक्की संपर्क करा. 

2) नेहमी थकवा जाणवणे आणि जास्त घाम येणे हाही हृदयाला छिद्र असण्याचा एक संकेत आहे. जर तुम्हाला नेहमीच थकवा जाणवत असेल किंवा फार जास्त घाम येत असेल तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण हा हृदयाला छिद्र असण्याचा संकेत असू शकतो.

3) जर तुम्हाला सतत श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर तुम्हाला निमोनिया, हृदयरोग किंवा हृदयाला छिद्र असण्याची समस्या असू शकते. अशात वेळीच डॉक्टरांना संपर्क करून योग्य त्या टेस्ट करून घ्या.

4) बोलताना किंवा चालता-फिरताना जर तुम्हाला श्वास भरून येत असेल तर हाही हृदयाला छिद्र असण्याचा संकेत असू शकतो. यामुळे लहान मुलांना बोलण्यातही समस्या होते. अशात वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.

5) हृदयाला छिद्र असण्याची समस्या असेल तर लहान मुलांचं शरीर पिवळं पडतं. तसेच यावेळी ओठ आणि नखेही प्रभावित होतात. शरीरावर अशी लक्षणे दिसली तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.

Web Title: These symptoms seen when there is a hole in the heart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.