टॉयलेटपेक्षाही जास्त अस्वच्छ असतात रोजच्या वापरातील या गोष्टी!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2018 12:23 PM2018-09-07T12:23:13+5:302018-09-07T12:31:02+5:30
जर तुम्ही स्वच्छतेबाबत फारच जागरुक राहत असाल आणि सार्वजनिक शौचालये जास्त स्वच्छ नसतात, असा विचार करुन ते वापरणे टाळत असाल तर आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या टॉयलेटपेक्षाही घाणेरड्या असतात.
जर तुम्ही स्वच्छतेबाबत फारच जागरुक राहत असाल आणि सार्वजनिक शौचालये जास्त स्वच्छ नसतात, असा विचार करुन ते वापरणे टाळत असाल तर आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या टॉयलेटपेक्षा घाणेरड्या असतात. या गोष्टींबाबत आपण नेहमीच डोळेझाक करतो आणि कशाचाही विचार न करता या गोष्टींचा बिनधास्त वापर करतो. चला जाणून घेऊ आपल्या आजूबाजूच्या अस्वच्छ गोष्टी कोणत्या आहेत.
एअरपोर्ट सिक्युरिटी ट्रे
(Image Credit : www.chron.com)
यूनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंघमच्या रिसर्चनुसार, एअरपोर्टवर वापरले जाणारे प्लास्टिक सिक्युरिटी ट्रे कोणत्याही पब्लिक टॉयलेटच्या तुलनेत अधिक अस्वच्छ असतात. या ट्रेच्या वापराने आपल्याला अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. रिसर्चमधून हे समोर आले आहे की, या ट्रेमध्ये जास्त व्हायरस असतात, जे कुणालाही सर्दी-खोकला, निमोनिया आणि ब्लॅडर इन्फेक्शन करु शकतो.
मोबाईल फोन
(Image Credit : www.wired.com)
मोबाईल फोन हे टॉयलेट सीटपेक्षाही जास्त अस्वच्छ असतात. अभ्यासकांनी सूक्ष्म जीवांच्या तीन अशा प्रजाती शोधून काढल्या आहेत ज्या मोबाईल फोनवर राहतात आणि वाढतात. काही स्मार्टफोन्सवर तर असे बॅक्टेरिया आढळतात ज्यांच्यावर औषधांचा अजिबार परिणाम होत नाही. २०१५ मध्ये यूनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियामध्ये मॉलिक्यूलर मायक्रोबायोलॉजी अॅन्ड इम्यूनॉलॉजी विभागाला एका अभ्यासात आढळलं की, टॉयलेटच्या सीटवर तीन प्रकारचे बॅक्टेरिया असतात. तर मोबाईल फोनवर साधारण १० ते १२ प्रकारचे वेगवेगळे फंगस आणि बॅक्टेरिया असतात.
ऑफिसची टी बॅग चहा
ब्रिटीश संस्था इनिशल वॉशरुम हायजीनने आपल्या एका रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, टी बॅगच्या चहामध्ये टॉयलेट सीटच्या तुलनेत १७ टक्के जास्त बॅक्टेरिया असतात. जास्तीत जास्त ऑफिसेसमध्ये टी बॅग असलेला चहा दिला जातो. पण या रिपोर्टनुसार, एका टॉयलेट सीटवर २२० बॅक्टेरिया असतात तर ऑफिसमधील टी बॅगच्या चहामध्ये ३, ७८५ बॅक्टेरिया असतात.
किचनमध्ये वापरला जाणारा कपडा
(Image Credit : www.thegoodbuy.com)
एक्सपर्टनी इशारा दिला आहे की, किचनमध्ये वापरल्या जाणाऱ्या कपड्यामध्ये ई-कोलाइ बॅक्टेरिया आढळतो. याने फूड पॉयजनिंगचा धोका असतो. एका नव्या शोधानुसार, हे समोर आले आहे की, किचनमध्ये पुन्हा पुन्हा एकच कपडा वापरल्याने परिवारातील सदस्यांना फूड पॉयजनिंगचा धोका असतो.
विमानातील सीट बेल्ट
(Image Credit : www.unitingaviation.com)
विमानातील सीट बेल्टमध्ये जास्त बॅक्टेरिया असतात. दररोज कितीतरी लोक सीट बेल्ट बांधण्यासाठी आणि काढण्यासाठी त्याला हात लावतात. यामुळे किटाणू पसरतात. त्यामुळे सतत एक हॅन्ड सॅनिटायझर सोबत ठेवा.