मधुमेह असल्यास आहारामध्ये 'या' पदार्थांचा समावेश करणं ठरेल फायदेशीर!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2018 10:31 AM2018-08-03T10:31:41+5:302018-08-03T10:31:58+5:30
सध्या मधुमेहाच्या रूग्णांमध्ये वाढ होत असून अगदी कमी वयाच्या मुलांमध्येही मधुमेहाचे प्रमाण आढळून येते. शरीराला मधुमेह जडल्यानंतर खाण्यापिण्याच्या बाबतीतही काळजी घ्यावी लागते.
सध्या मधुमेहाच्या रूग्णांमध्ये वाढ होत असून अगदी कमी वयाच्या मुलांमध्येही मधुमेहाचे प्रमाण आढळून येते. शरीराला मधुमेह जडल्यानंतर खाण्यापिण्याच्या बाबतीतही काळजी घ्यावी लागते. कारण तुम्ही खाल्लेला कोणताही पदार्थ तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढवू शकतो. आज आम्ही तुम्हाला अशा काही पदार्थांबाबत सांगणार आहोत ज्यांच्या सेवनाने तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास तुम्हाला मदत होईल.
1. फॅट फिश (oilyfish)मध्ये ओमेगा 3 फॅट अॅसिड मोठ्या प्रमाणावर असतं. जे मधुमेहाच्या रूग्णासाठी अत्यंत गुणकारी असतं. आठवड्यातून तीन वेळा याचे सेवन केल्यानं शरीरातील साखरेचं प्रमाण कमी होण्यासोबतच हार्ट स्ट्रोकचा धोकाही कमी होतो.
2. ब्लूबेरीमध्ये फ्लेवोनॉयड्स, फायबर आणि एंथोसायनिन यांसारखी तत्व असतात. जे टाइप टू प्रकाराच्या मधुमेहाचा धोका कमी करतात. याव्यतिरिक्त ब्लूबेरीमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर आणि अलर्जिक अॅसिडही मुबलक प्रमाणात असतं. जे शरीरातील इन्सुलिन आणि साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवतं.
3. मधुमेहाच्या रूग्णांसाठी हिरव्या पालेभाज्यांचं सेवन करणं अत्यंत लाभदायी असतं. हिरव्या पालेभाज्यांमध्ये पोषक तत्व आणि अॅन्टीऑक्सिडेंटचे प्रमाण भरपूर असतात. त्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते तसेच हृदय आणि डोळ्यांचे आरोग्य चांगलं राखण्यासही मदत होते.
4. जर तुम्ही मधुमेह नियंत्रणात ठेवू इच्छिता तर त्यासाठी दररोज दालचीनीचे सेवन करावे. एक कप पाण्यामध्ये दालचीनी पावडर टाकून ते नीट उकळवून घ्यावे. दालचीनीमधील पोषक तत्व शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
टिप : वरील उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.