हिवाळ्यात सकाळी उठून करा हे 3 काम, जवळही येणार नाही सर्दी-खोकला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 10:42 AM2023-12-15T10:42:58+5:302023-12-15T10:43:34+5:30
Winter Health Tips : या दिवसात तुम्हालाही शरीर आतून फीट ठेवायचं असेल तर चार महत्वाच्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Winter Health Tips : हिवाळ्याला सुरूवात झाली की, हमखास जास्तीत जास्त लोकांना सर्दी, खोकला आणि कफची समस्या होते. अशात या दिवसांमध्ये स्वत:ची काळजी घेणं फार गरजेचं असतं. हिवाळ्यात स्वत:ला गरम ठेवणं आवश्यक असतं. या दिवसात तुम्हालाही शरीर आतून फीट ठेवायचं असेल तर चार महत्वाच्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
भाज्यांच्या ज्यूसने करा दिवसाची सुरूवात
हिवाळ्यात सकाळी उठून रिकाम्या पोटी गाजर, बीट, कोथिंबीर, आवळा आणि पदीन्याचा मिक्स ज्यूस पिणं खूप फायदेशीर ठरतं. हिवाळ्यात भांज्याच्या ज्यूसच्या मदतीने बॉडी डिटॉक्स होते. सोबतच अनेक आजारांचा धोकाही कमी होतो. हवं तर तुम्ही सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून पिऊ शकता. हे वजन कमी करणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर ठरतं.
30 मिनिटे व्यायाम
सकाळी ज्यूस किंवा लिंबू पाणी प्यायल्यानंतर तुम्ही कमीत कमी 30 मिनिटे व्यायाम करायला हवा. व्यायाम केल्याने शरीराची उष्णता वाढल्याने तुम्ही थंडी लागणार नाही. सोबतच हिवाळ्यात शरीरात जो आळस येतो तोही याने दूर होईल. तसेच दिवसभर शरीर अॅक्टिव राहणार. त्यासोबतच इम्यूनिटी बूस्ट होईल, ज्याचा फायदा तुमच्या शरीराला मिळेल.
खाण्या-पिण्याची काळजी
हिवाळ्यात खाण्या-पिण्याची काळजी घेणंही फार महत्वाचं असतं. उष्ण असलेले पदार्थ खाल्ल्याने जास्त फायदा मिळतो. सोबतच जेवणही नेहमीच गरम खाल्लं पाहिजे. पाणी सुद्धा हलकं गरम किंवा कोमट प्यावं. असं केल्याने तुमचं पचन चांगलं होईल आणि तुम्हाला हेल्दी वाटेल. हिवाळ्यात बरेच लोक कमी पाणी पितात हे चुकीचं आहे. या दिवसात भरपूर पाणी प्यावे. सोबतच ड्राय फ्रुट्सचं सेवनही करावं. आहारात वेगवेगळ्या पालेभाज्या आणि फळांचा समावेश करावा.