जास्त आयुष्य जगण्यासाठी वापरा 'या' टिप्स; अनेक आजार होतील दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 02:40 PM2019-10-02T14:40:34+5:302019-10-02T14:41:16+5:30
दिर्घायुषी होण्यासाठी आपल्यापैकी बरेचजण अनेक उपाय करताना दिसतात. एवढचं नाहीतर योग्य आहार, एक्सरसाइज,योगाभ्यास आणि वर्कआउट यांसारख्या गोष्टींचाही समावेश करतात. असं केल्याने शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यही राखण्यास मदत होते.
(Image Credit : New Straits Times)
दिर्घायुषी होण्यासाठी आपल्यापैकी बरेचजण अनेक उपाय करताना दिसतात. एवढचं नाहीतर योग्य आहार, एक्सरसाइज,योगाभ्यास आणि वर्कआउट यांसारख्या गोष्टींचाही समावेश करतात. असं केल्याने शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यही राखण्यास मदत होते. या धकाधकीच्या जगामध्ये संपूर्ण दिवस एखाद्या मशीनप्रमाणे राबल्यानंतर शरीराची काळजी घेण्याची गरज असते. आतापासूनच शरीराची काळजी घेतली तर वाढत्या वयातही फिट अन् फाइन राहण्यास मदत होते. जर आरोग्याकडे दुर्लक्षं केलं तर मात्र वाढत्या वयासोबतच शरीराच्या अनेक समस्यांचाही सामना करावा लागतो. अशातच तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये काही बदल करणं गरजेचं असतं. जाणून घेऊया फिट राहण्यासाठी जीवनशैलीमध्ये कराव्या लागणाऱ्या बदलांबाबत...
फिट राहण्यासाठी फॉलो करा या टिप्स :
1. सकाळी उशिरा उठत असाल तर तुमची ही सवय लगेच बदला. सूर्योदयाच्या आधी उठून चालायला किंवा फिरायला जा. यामुले मन शांत होण्यासोबतच अनेक आरोग्यदायी फायदेही होतील.
2. दररोज जवळपास 30 मिनिटांसाठी योगाभ्यास, एक्सरसाइज आणि मेडिटेशन करा. यामुळे आरोग्य उत्तम राखण्यासोबतच अॅक्टिव राहण्यास मदत होते.
3. हेल्दी आणि संतुलित डाएट घ्या. तसेच तुम्ही कोणताही आहार घेत असाल तर खाण्यात येणारे पदार्थ व्यवस्थित चावून खा. यामुळे अन्न व्यवस्थित पचण्यास मदत होते. तसेच मसालेदर पदार्थ, जंक फूड किंवा स्ट्रिट फूडपासून शक्य तेवढे दूर राहा.
4. फळं आणि भाज्यांचं सेवन करा. यांच्या सेवनाने शरीराला आवश्यक असणारी पोषक तत्व मिळण्यास मदत होते.
5. निरोगी आयुष्य जगण्यासाठी जेवढं शक्य असेल तेवढं पायी चालण्याचा प्रयत्न करा. काही कामासाठी जवळच जायचं असेल तर चालतचं जा. त्यामुळे स्नायूंचा व्यायाम होतो. ज्यामुळे तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकता.
6. तुमचं बैठं काम असेल तर थोड्या वेळाने जागेवरून उठत जा. सतत बराच वेळ बसून राहू नका. त्यामुळे शरीर अॅक्टिव्ह राहतं.
7. वाढणारं वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी घरगुती उपाय, वर्कआउट करा. लठ्ठपणा कमी करण्यासाठी तेलकट आणि गोड पदार्थांचं सेवन कमी करा. यामुळे चरबी वाढण्यासोबतच शरीर सुस्त होतं.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणाताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)