गरोदर महिलांना कोरोना व्हायरसच्या जाळ्यात अडकण्यापासून वाचवतील 'या' टिप्स
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 01:44 PM2020-02-16T13:44:00+5:302020-02-16T13:44:20+5:30
गरोदरपणात सगळ्याच महिलांना स्वतःपेक्षा जास्त त्यांच्या रक्तामासात वाढत असलेल्या बाळाची जास्त काळजी असते.
गरोदरपणात सगळ्याच महिलांना स्वतःपेक्षा जास्त त्यांच्या रक्तामासात वाढत असलेल्या बाळाची जास्त काळजी असते. फक्त स्वतः नाही तर आपली रोगप्रतिकारकशक्ती आई आपल्या बाळासोबत शेअर करत असते. यामुळेच गरोदर महिला सगळयात जास्त आजारी पडत असतात. सध्याच्या काळात कोरोना व्हायरसचा धोका जगभरात वाढत असताना गरोदर महिलांना इतर महिलांपेक्षा जास्त सर्तक राहणं गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला गरोदरपणात तुमचं आणि तुमच्या बाळाचं कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी कोणते उपाय करणं गरजेचं आहे हे सांगणार आहोत.
गरोदर महिलांना जर सर्दी, खोकला, ताप यांसारख्या समस्या उद्भवत असतील तर त्याचे रूपांतर नकळतपणे मोठ्या आजारात होऊ शकतं. रिसर्चकर्त्यांच्यामते गरोदर महिलेला कोरोना व्हायरसचा धोका उद्भवला तरी हा व्हायरस बाळापर्यंत पोहोचण्याची शक्यता कमी असते. पण तरी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी या काही टिप्स फॉलो करा. ( हे पण वाचा-Coronavirus : कोरोना व्हायरसवर उपाय सापडल्याचा चीनचा दावा, जाणून घ्या काय आहे तथ्य! )
(Image credit- ABC news)
हातांना स्वच्छ ठेवण्यासाठी कोणत्याही वस्तूला स्पर्श केल्यानंतर हात स्वच्छ धुवा.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाईजेशनने दिलेल्या माहितीनुसार मास्कचा वापर करणं गरजेचं आहे.
शरीर हार्ड्रेट ठेवा. त्यासाठी जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करा.
स्वतःच्या मर्जीने गोळ्यांचं सेवन करू नका.
जर शरीरात काही वेगळे बदल जाणवत असतील तर घरगुची उपायांवर अवलंबून न राहता आधी दवाखान्यात जा.
संतुलीत आहार घ्या.
( हे पण वाचा-तांब्याचं ब्रेसलेट वापरल्याने शरीराला मिळतात हे ८ फायदे, आठवडाभरात दिसेल फरक!)