शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतात 'या' खास भाज्या, हृदयही राहतं निरोगी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 11:14 AM2024-10-04T11:14:29+5:302024-10-04T11:15:05+5:30

Vegetable For Bad Cholesterol : मेंदू आणि हृदयाला पुरेसं रक्त मिळालं नाही तर हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येतो. अशात तुम्ही कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काही भाज्यांचं सेवन करू शकता.

These vegetables can help reduce high cholesterol levels | शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतात 'या' खास भाज्या, हृदयही राहतं निरोगी!

शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतात 'या' खास भाज्या, हृदयही राहतं निरोगी!

Vegetable For Bad Cholesterol : हाय कोलेस्ट्रॉलला सायलेंट किलर म्हटलं जातं. शरीरात कोलेस्ट्रॉल वाढलं की, हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका खूप जास्त वाढतो. शरीरात जेव्हा कोलेस्ट्रॉल वाढतं तेव्हा ते रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ लागतं. ज्यामुळे हृदयापर्यंत रक्तप्रवाह सुरळीत होत नाही. मेंदू आणि हृदयाला पुरेसं रक्त मिळालं नाही तर हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येतो. अशात तुम्ही कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काही भाज्यांचं सेवन करू शकता. अशाच काही फायदेशीर भाज्यांबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

वांगी

वांग्यांमध्ये डायटरी फायबर असतं जे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं. यातील फायबर आतड्यांमधील कोलेस्ट्रॉलचं अवशोषण हळुवार करतं. ज्यामुळे कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी होते. वांग्यांमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंटही असतात जे रक्तवाहिन्या डॅमेज होण्यापासून बचाव करतात.

गाजर

गाजरामध्येही डायटरी फायबर भरपूर प्रमाणात असतं. जे आतड्यांमध्ये कोलेस्ट्रॉलचं अवशोषण कमी करतं. गाजरामध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आणि बीटा-कॅरोटीनने धमण्यांमधील ऑक्सीडेटिव्ह स्ट्रेस आणि सूज कमी होते. याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं.

भेंडी

भेंडीमध्ये असे अनेक पोषक तत्व असतात जे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. भेंडीमध्ये म्यूसिलेजही असतं, जो एक जेलसारखा पदार्थ आहे. याने शरीरातील विषारी पदार्थ आणि कोलेस्ट्रॉल बाहेर पडतं. भेंडीचं नियमितपणे सेवन केलं तर शरीरात गुड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं.

ब्रोकली

ब्रोकलीमध्ये सुद्धा असे अनेक पोषक तत्व असतात, जे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करण्यास मदत करतात. यात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात, सोबतच फायटोकेमिकल्स असतात जे हृदय निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर असतात.

पालक

पालकाचं सेवन केल्याने शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते. पालकामुळे धमण्यांमध्ये जमा झालेलं कोलेस्ट्रॉल बाहेर निघतं. रोज पालकाचं सेवन केल्याने हृदयाचं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं.

Web Title: These vegetables can help reduce high cholesterol levels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.