'या' भाज्यांचं नियमित सेवन कराल तर कधीच खराब होणार नाही लिव्हर, जाणून घ्या कोणत्या?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 12:11 PM2024-09-14T12:11:43+5:302024-09-14T12:30:42+5:30

Liver Detox Vegetable : आपण जे काही खातो ते लिव्हरच्या माध्यमातून संपूर्ण शरीरात पोहोचवलं जातं. ज्या व्यक्तीचं लिव्हर कमजोर असतं त्यांची इम्यूनिटी कमजोर असते.

These vegetables can keep liver healthy and detoxify liver | 'या' भाज्यांचं नियमित सेवन कराल तर कधीच खराब होणार नाही लिव्हर, जाणून घ्या कोणत्या?

'या' भाज्यांचं नियमित सेवन कराल तर कधीच खराब होणार नाही लिव्हर, जाणून घ्या कोणत्या?

Liver Detox Vegetable : लिव्हर मानवी शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. शरीरात लिव्हर सगळ्यात मोठ्या आकाराचा अवयव असतो आणि याद्वारे शरीरातील वेगवेगळी काम केली जातात. लिव्हर पूर्ण शरीराचं पॉवर हाऊस म्हटलं जातं. आपण जे काही खातो ते लिव्हरच्या माध्यमातून संपूर्ण शरीरात पोहोचवलं जातं. ज्या व्यक्तीचं लिव्हर कमजोर असतं त्यांची इम्यूनिटी कमजोर असते आणि अशात ते सहजपणे कोणत्याही आजारांचे शिकार होतात.

लिव्हरचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे याची माहिती साओल हार्ट सेंटरचे डॉक्टर विमल छाजेर यांनी आपल्या एका व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे. त्यांनी अशा काही गोष्टींबाबत सांगितलं आहे की, ज्यांच्या मदतीने लिव्हर डिटॉक्सिफाय करून ते निरोगी ठेवण्यास मदत मिळते.

लिव्हर शरीरात वेगवेगळी कामे करतं. याद्वारे प्रोटीन कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन्स, मिनरल्स स्टोर करण्याचं काम केलं जातं. जर तुमचं लिव्हर योग्यपणे काम करत असेल तर तुम्ही फीट आणि निरोगी रहाल. लिव्हर प्रोटीन आणि हार्मोन्स रिलीज करण्याचं काम करतं. ज्यांची गरज शरीरातील इतर अवयवांना सुद्धा पडते.

इम्यूनिटी मजबूत ठेवतं

जर तुमचं लिव्हर निरोगी असेल तर तुम्ही अनेक आजारांपासून बचाव करू शकता. कारण लिव्हरद्वारे इम्यूनिटी मजबूत करण्याचं देखील काम केलं जातं. ज्यामुळे वेगवेगळ्या इन्फेक्शनपासून तुमचा बचाव होतो. यासाठी गरजेचं आहे की, तुम्ही तुमच्या लिव्हरची योग्य ती काळजी घ्या. रोज पौष्टिक आहाराचं सेवन करा आणि नियमितपणे एक्सरसाईज करा.

लिव्हर डिटॉक्स करणाऱ्या भाज्या

कोबीच्या सगळ्या प्रजाती लिव्हरसाठी फार फायदेशीर असतात. ब्रोकली, पत्ता कोबी, फूल कोबी, ब्रसेल्स स्प्राउट्स या सगळ्यांमध्ये ग्लूटाथियोन असतं जे लिव्हर डिटॉक्स करणारे एझाइम्स अ‍ॅक्टिवेट करतं. यात ग्लूकोसिनोलेट नावाचं सल्फर कंपाऊंड असतं जे शरीरात जाऊन शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतं. याने कॅन्सरसारखा आजारही ठीक होतो आणि त्यापासून बचाव करण्यास मदत मिळते.

चाकवत भाजीही फायदेशीर

चाकवत ही भाजी भरपूर लोक आवडीने खातात. या भाजीमध्ये आयर्न भरपूर प्रमाणात असतं. तसेच यात पोटॅशिअम आणि अ‍ॅल्युमिनियमही भरपूर प्रमाणात असतं. आयुर्वेदानुसार, ही भाजी खाल्ल्याने पित्त दोषही दूर होतो. त्याशिवाय लिव्हरही मजबूत होतं. चाकवतच्या भाजीच्या माध्यमातून लिव्हरसंबंधी अनेक समस्या दूर करण्यास मदत मिळते. तसेच या भाजीने पचन तंत्रही चांगलं राहतं. 

आंबट फळं

आंबट फळं जसे की, आवळा, संत्री, लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर असतात. यांच्या सेवनाने लिव्हर निरोगी राहतं. त्यामुळे या आंबट फळांचा रोज आहारात समावेश करायला हवा. आंबट फळांच्या ज्यूसचंही तुम्ही सेवन करू शकता.

Web Title: These vegetables can keep liver healthy and detoxify liver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.