'या' 5 भाज्यांमुळे किडनीमध्ये होऊ शकतो स्टोन, 99 टक्के लोक खातात यातील शेवटची भाजी!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 03:01 PM2024-07-20T15:01:20+5:302024-07-20T15:02:11+5:30
Kidney Stones : जर तुम्हाला किडनी स्टोनपासून बचाव करायचा असेल किंवा तुम्हाला आधीच किडनी स्टोन झाला असेल तर असे पदार्थ खाणं टाळलं पाहिजे ज्यात ऑक्सालेटचं प्रमाण जास्त असतं.
Kidney Stones : किडनी स्टोनची समस्या आजकाल खूप लोकांना होत आहे. किडनी स्टोनची समस्या झाली की, असह्य वेदना होतात. किडनी स्टोन होण्याची वेगवेगळी कारणे आहेत ज्यातील एक कारण म्हणजे कॅल्शिअम ऑक्सालेट आहे. ऑक्सालेट एक असा पदार्थ आहे जो लिव्हर द्वारे तयार होतो. हा रोज खाल्ल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांमध्ये आढळतो.
कॅल्शिअम ऑक्सालेट किडनी स्टोन होण्याचा सगळ्यात कॉमन प्रकार आहे. जेव्हा लघवीमध्ये कॅल्शिअम ऑक्सालेटचं प्रमाण खूप जास्त होतं तेव्हा स्टोन तयार होतात. जेवण केल्यावर शरीरात शिल्लक राहिलेले अपशिष्ट पदार्थ रक्ताद्वारे किडनीमध्ये पोहोचतात आणि मग लघवीद्वारे बाहेर निघतात. ऑक्सालेट एक असा पदार्थ आहे जो लघवीमध्ये क्रिस्टल बनवू शकतो आणि स्टोनमध्ये रूपांतरीत होतो.
जर तुम्हाला किडनी स्टोनपासून बचाव करायचा असेल किंवा तुम्हाला आधीच किडनी स्टोन झाला असेल तर असे पदार्थ खाणं टाळलं पाहिजे ज्यात ऑक्सालेटचं प्रमाण जास्त असतं. मेडिकल कॉलेज ऑफ विस्कॉन्सिन (MCW) ने काही अशा भाज्यांबाबत सांगितलं आहे. ज्यात ऑक्सालेटचं प्रमाण अधिक असतं. किडनीच्या रूग्णांनी या भाज्या टाळल्या पाहिजे. त्या कोणत्या आहेत हे जाणून घेऊ.
शतावरी
शतावरी एक औषधी वनस्पती आहे आणि याला आयुर्वेदातही फार महत्व आहे. वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी याचा वापर केला जातो. जर तुम्हाला किडनी स्टोन झाला असेल तर याचं सेवन तुम्ही टाळलं पाहिजे. याच्या 100 ग्रॅम प्रमाणात 512 मिलीग्रॅम ऑक्सालेट असतं.
बटाटे
तुम्हाला माहीत नसेल पण एका बटाट्यामध्ये 97 मिलीग्रॅम ऑक्सालेट असतं. जास्त ऑक्सालेट बटाटाच्या सालीमध्ये असतं. बटाटाच्या सालीमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन सारखे पोषक तत्वही भरपूर असतात.
ग्रीन बीन्स
ग्रीन बीन्समध्ये वेगवेगळे पोषक तत्व असतात जसे की, प्रोटीन, व्हिटॅमिन आणि कॅल्शिअम इत्यादी. याच्या सेवनाने हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. पण किडनीच्या रूग्णांनी याचं सेवन करणं टाळलं पाहिजे. कारण याच्या 100 ग्रॅम प्रमाणात 15 मिलीग्रॅम ऑक्सालेट असतं.
रताळे
रताळे एक कंदमुळं असलेली भाजी आहे. याचं वेगवेगळ्या पद्धतीने सेवन केलं जातं. यात आयर्न, व्हिटॅमिन आणि मिनरल्स भरपूर असतात. सोबतच यात ऑक्सालेटही भरपूर असतं. याच्या 100 ग्रॅम मध्ये 675 मिलीग्रॅम ऑक्सालेट असतं.
पालक
हिरवी पालेभाजी जसे की, पालक यात अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात, पण यात ऑक्सालेटही भरपूर असतं. अर्धा कप शिजवलेल्या पालकमध्ये 755 मिलीग्रॅम ऑक्सालेट असतं.