बदलत्या वातावरणात ताप-सर्दीने आहात हैराण, या गोष्टींची घ्या काळजी!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 10:40 AM2018-09-11T10:40:32+5:302018-09-11T10:41:02+5:30

सध्या पाऊस नसला तरी बदलत्या वातावरणामुळे अनेकांना सर्दी आणि खोकल्याची समस्या भेडसावत आहे. पावसानंतर अचानक तापमानात बदल होत असल्याने ताप आणि वायरल इन्फेक्शनचा अधिक धोका असतो.

Things to avoid in fever and cold due to Wheather change | बदलत्या वातावरणात ताप-सर्दीने आहात हैराण, या गोष्टींची घ्या काळजी!

बदलत्या वातावरणात ताप-सर्दीने आहात हैराण, या गोष्टींची घ्या काळजी!

Next

सध्या पाऊस नसला तरी बदलत्या वातावरणामुळे अनेकांना सर्दी आणि खोकल्याची समस्या भेडसावत आहे. पावसानंतर अचानक तापमानात बदल होत असल्याने ताप आणि वायरल इन्फेक्शनचा अधिक धोका असतो. ही समस्या लगेच बरी होत नसेल तर तुमचं काहीतरी नक्कीच चुकतंय. ते नक्की काय चुकतंय हे खालीलप्रमाणे सांगता येईल. पण काही घरगुती उपायांनी ताप आणि सर्दी दूर केली जाऊ शकते. 

पाणी कमी पिणे

वायरल ताप आलेला असताना भरपूर प्रमाणात पाणी प्यावे. त्यासोबतच ज्यूस आणि कॅफिन नसलेल्या चहाचं सेवन करावे. जास्तीत जास्त फळांमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट्स आढळतात, याने तुमच्या शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते आणि तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. जर तुम्हाला डायरिया किंवा उलटीची समस्या असेल इलेक्ट्रॉलचं सेवन करा. यासोबत लिंबू, पुदीना, मध यांचाही फायदा होतो.

एअर कंडीशनमध्ये झोपणे

वातावरणात बदल झाल्यानंतरही काही लोक एसीचा वापर करतात. वातावरणात बदल झाल्यानंतर दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानात फार मोठा बदल होतो.अशात एसीमध्ये झोपल्यास शरीराचं तापमान फार कमी होतं. याचा नाक आणि घशावर वाईट प्रभाव पडतो. अनेकदा फार जास्त वेळ थंडीमध्ये झोपल्यास ताप येऊ शकतो. तसेच एका शोधानुसार, एसीमध्ये झोपल्याने शरीराची रोगप्रतिकारकशक्तीवर वाईट प्रभाव पडतो. 

स्वच्छतेची काळजी न घेणे

वायरल आजारांचा धोका सर्वात जास्त त्या लोकांना असतो जे आपल्या शरीराची आणि आजूबाजूच्या स्वच्छतेची काळजी घेत नाहीत. वातावरणात बदल झाल्यावर शरीरात जीवाणू जास्त सक्रिय होतात. त्यामुळे स्वच्छतेची काळजी घेणे फार गरजेचे आहे. रोज चांगली आंघोळ करणे, कपडे उन्हात वाळत घालणे, बाथरुम आणि टॉयलेटची चांगली स्वच्छता करणे, खोकलताना आणि छिंकताना तोंडावर रुमाल ठेवा. यासोबतच भाज्या चांगल्या धुवून शिजवा. 

खोकलल्यानंतर आणि छिंकल्यानंतर कपड्यांना तोंड पुसणे

वातावरणातील बदलामुळे वायरल इन्फेक्शनचे जीवाणू जास्त सक्रिय होतात. त्यामुळे या दिवसात सार्वजनिक ठिकाणी छिंकताना आणि खोकलताना नेहमी रुमाला वापरा. याने इन्फेक्शनचा धोका कमी होतो. वातावरणात असलेले बॅक्टेकिया एकमेकांच्या श्वासाच्या माध्यमातून शरीरात शिरतात. 

Web Title: Things to avoid in fever and cold due to Wheather change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.