'ही' गंभीर समस्या झाल्यावर येते चिकट लघवी, अनेक अवयव होतात निकामी!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 01:00 PM2023-07-20T13:00:15+5:302023-07-20T13:01:23+5:30

Greasy Urine: आजकाल वेगवेगळ्या कारणांची लोकांना यूरिनची समस्या वाढत आहे. लोकांना लघवी करताना जळजळ, रक्त येणं अशा समस्या होतात. पण चिकट लघवी येणं वेगळ्या समस्येचं कारण असू शकते.

Things to get rid of sticky and greasy urine shared by Ayurveda doctor | 'ही' गंभीर समस्या झाल्यावर येते चिकट लघवी, अनेक अवयव होतात निकामी!

'ही' गंभीर समस्या झाल्यावर येते चिकट लघवी, अनेक अवयव होतात निकामी!

googlenewsNext

Greasy Urine: शरीरातील विषारी पदार्थ किडनी बाहेर काढते. जर हे विषारी पदार्थ शरीरातून बाहेर काढले नाही तर वेगवेगळे अवयव खराब होऊ लागतात. विषारी पदार्थ लघवीतूनही बाहेर निघू लागतात. याच कारणाने यूरिन टेस्ट करून तुम्ही याची माहिती घेऊ शकता.

आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना यूरिनची समस्या वाढत आहे. लोकांना लघवी करताना जळजळ, रक्त येणं अशा समस्या होतात. पण चिकट लघवी येणं वेगळ्या समस्येचं कारण असू शकते. आयुर्वेदिक एक्सपर्ट डॉ. अबरार मुल्तानी यांनी सांगितलं की, कफ दोष वाढल्यानंतर अशी समस्या होते. जी काही पदार्थ खाल्ल्याने वाढते.

कफ वाढण्याची कारणं

डॉ. अबरार मुल्तानी यांनी सांगितलं की, आयुर्वेदात कफ दोषाला जड आणि चिकट सांगण्यात आलं आहे. जे वाढल्याने वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कफ वेगवेगळ्या कारणांनी वाढतो.

लघवी आणि विष्ठेत चिकटपणा

- चिकट शरीर

- डोळे आणि नाकातील घाण वाढणं

- शरीरात जडपणा

-  सुस्ती आणि आळसपणा

- जास्त झोप येणं

- शरीरात सैलपणा येणं

- डिप्रेशन

- श्वास घेण्यास समस्या

- पुन्हा पुन्हा खोकला येणं

कोणते पदार्थ खाणं सोडावे?

- केळी आणि आंबे खाणं सोडा

- खजूर

- अंजीर

- कलिंगड

- मैद्यापासून तयार पदार्थ

- टोमॅटो

- काकडी

- रताळे

कफ दोष कसा दूर करावा?

आयुर्वेदात कफ दोष दूर करण्यासाठी तिखट आणि गरम खाद्य पदार्थ खाण्याचा उपाय सांगण्यात आला आहे. त्यामुळे आहारात बाजरी, मका, गहू, पालक, शिमला मिरची, मटर, बटाटे, मूळा, रताळे, छास-पनीर, शिजलेल्या डाळी यांचा समावेश करा.

कफ दोष संतुलित असायला हवा. तो कमी झाल्यासही समस्या होऊ शकतात. रूग्णाचं शरीर कोरडं होऊ शकतं आणि आत जळजळ होऊ शकते. अशात रूग्णांना झोप येत नाही आणि कमजोरी वाटू लागते. तेच फुप्फुसं, हाडे आणि डोकं हलकं वाटू लागतं.

Web Title: Things to get rid of sticky and greasy urine shared by Ayurveda doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.