वॉक करताना 'या' गोष्टींकडे कराल दुर्लक्ष तर गुडघे होऊ शकतात खराब, जाणून योग्य पद्धत...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 01:14 PM2024-09-05T13:14:10+5:302024-09-05T13:19:38+5:30
Morning Walk Tips: जर वॉक करताना तुम्ही योग्य शूज वापरत नसाल, योग्य जागा निवडत नसाल किंवा चालण्याची योग्य पद्धत वापरत नसाल तर गुडघ्यांवर जास्तीचा दबाव पडू शकतो.
Morning Walk Tips: पायी चालणं गुडघ्यांच्या मांसपेशी मजबूत बनवण्यासाठी फायदेशीर असतं. पायी चालल्याने गुडघ्याच्या मांसपेशी लवचिक, सक्रिय, स्थिर आणि मजबूत होतात. पण जर पायी चालताना तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर गुडघ्यांची समस्या वाढू शकते. जर वॉक करताना तुम्ही योग्य शूज वापरत नसाल, योग्य जागा निवडत नसाल किंवा चालण्याची योग्य पद्धत वापरत नसाल तर गुडघ्यांवर जास्तीचा दबाव पडू शकतो.
वॉक करताना या चुका केल्यामुळे गुडघ्यांमध्ये वेदना, सूज किंवा इतर काही समस्या होण्याचा धोका वाढू शकतो. अशात वॉक करताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. असं केलं नाही तर पायी चालण्याचे फायदे मिळण्याऐवजी तुम्हाला नुकसान होतील.
वॉक करताना काय काळजी घ्याल?
योग्य शूजची निवड
योग्य शूज तुमच्या गुडघ्याला सपोर्ट आणि सुरक्षा देतात. चांगल्या शूजमध्ये पुरेसा आर्च सपोर्ट आणि पॅडिंग असतं. ज्यामुळे चालताना पायांना त्रास होत नाही. त्यासोबतच शूजची साइजही योग्य असली पाहिजे. जेणेकरून तुमच्या पायांवर आणि गुडघ्यावर दबाव पडू नये.
सुरूवात हळूवार करा
वॉकची सुरूवात हलकी आणि कमी अंतराने करा. अचानक फार जास्त चालल्याने गुडघ्यांवर जास्त दबाव पडू शकतो. त्यामुळे हळूहळू वॉकचं अंतर आणि वेळ वाढवा.
चालण्याची योग्य पद्धत
वॉक करताना पावलं योग्य पद्धतीने टाका. जोरजोरात पावलं टाकू नये. पावलं हळू टाका आणि गुडघे सरळ ठेवा. याने गुडघ्यावर दबाव कमी पडेल.
जागेची निवड
वॉक करण्यासाठी सरळ जागेची निवड करा. कठोर किंवा क्रॉकिंटवर चालल्याने गुडघ्यांवर अतिरिक्त दबाव पडू शकतो. पार्क किंवा गवत असलेल्या जागेवर वॉक करणं कधीही चांगलं.
स्ट्रेचिंग आणि वॉर्म-अप -
वॉक करण्याआधी आणि नंतर स्ट्रेचिंग करायचं हवं. स्ट्रेचिंग केल्याने गुडघ्यांवरील तणाव कमी होतो आणि मांसपेशी लवचिक होतात. त्याशिवाय हलका वार्म-अप केल्याने शरीर वॉकसाठी तयार करण्यास मदत मिळते.
वजन नियंत्रित ठेवा
वजन नियंत्रित ठेवा. कारण जास्त वजन असल्यावर जास्त वॉक कराल तर गुडघ्यांवर अतिरिक्त दबाव पडतो. संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करून तुम्ही वजन नियंत्रित ठेवू शकता.