डिप्रेशनपासून दूर ठेवतील 'हे' पदार्थ, मानसिक आरोग्यही सुधारेल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 04:44 PM2022-08-07T16:44:24+5:302022-08-07T16:44:57+5:30

नैराश्याने ग्रासलेल्या लोकांना हेल्दी डाएट घेण्याचा सल्ला तज्ञ नेहमीच देतात. चांगले खाल्ल्याने तुम्ही नैराश्याचे परिणाम काही प्रमाणात कमी करू शकता. आज आम्‍ही तुम्‍हाला अशाच पदार्थांबद्दल सांगत आहोत, जे खाल्याने तुम्ही डिप्रेशनपासून दूर रहाल आणि मानसिक स्‍वास्‍थ्‍य मजबूत होईल.

this food will keep you away from depression know more | डिप्रेशनपासून दूर ठेवतील 'हे' पदार्थ, मानसिक आरोग्यही सुधारेल

डिप्रेशनपासून दूर ठेवतील 'हे' पदार्थ, मानसिक आरोग्यही सुधारेल

Next

डिप्रेशनच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी खाण्यापिण्याची काळजी घ्यावी. जंक फूड आणि अस्वास्थ्यकर पदार्थ खाल्ल्याने डिप्रेशनची समस्या वाढू शकते. जास्त प्रमाणात कॅफीन, प्रक्रिया केलेले अन्न आणि शुद्ध साखर यासारख्या पदार्थांचे सेवन केल्याने मानसिक आरोग्यास समस्या निर्माण होऊ शकतात. नैराश्याने ग्रासलेल्या लोकांना हेल्दी डाएट घेण्याचा सल्ला तज्ञ नेहमीच देतात. चांगले खाल्ल्याने तुम्ही नैराश्याचे परिणाम काही प्रमाणात कमी करू शकता. आज आम्‍ही तुम्‍हाला अशाच पदार्थांबद्दल सांगत आहोत, जे खाल्याने तुम्ही डिप्रेशनपासून दूर रहाल आणि मानसिक स्‍वास्‍थ्‍य मजबूत होईल.

भरपूर फळे आणि भाज्या खा
हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, कार्बोहायड्रेटयुक्त अन्न खाल्ल्याने आपल्या मेंदूमध्ये सेरोटोनिन हार्मोन सिक्रीट होते. ज्यामुळे मूड सुधारतो. भाज्या आणि फळे कार्बोहायड्रेट्सने समृद्ध असतात. हे नैराश्याशी लढण्यास मदत करते आणि मानसिक आरोग्य सुधारते. फळांमध्ये फायबरचे प्रमाणही जास्त असते.

दुधामुळे सुधारते मानसिक आरोग्य
आतापर्यंत अनेक अभ्यासांमध्ये हे समोर आले आहे की व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे नैराश्याचा धोका वाढतो. सूर्यप्रकाशापासून व्हिटॅमिन डी देखील मिळू शकते. पण तुम्हाला ते खाल्ल्यानेच भरपूर प्रमाणात मिळेल. दूध आणि टोफूमध्ये व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात आढळते. याच्या सेवनाने तुमचे मानसिक आरोग्य सुधारेल.

व्होल ग्रेन्स
सेलेनियम असलेल्या पदार्थांचे सेवन मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. व्होल ग्रेन्स म्हणजेच संपूर्ण धान्य, शेंगा, सीफूड, मांस यामध्ये सेलेनियमचे प्रमाण लक्षणीय असते. या गोष्टींचे सेवन केल्याने तुम्हाला नैराश्यापासून बऱ्याच अंशी आराम मिळू शकतो. या गोष्टींचा आहारात नियमित समावेश केल्यास मानसिक आरोग्य चांगले राहते.

Web Title: this food will keep you away from depression know more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.