30 वयानंतर रोज या खास चहाचं करा सेवन, त्वचेवर सुरकुत्या येण्याची समस्या होईल दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 10:50 AM2024-02-19T10:50:12+5:302024-02-19T10:51:34+5:30
वय वाढण्यासोबत तुम्हाला तुमचं शरीर आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी आपल्या खास डाएटवर फोकस केलं पाहिजे.
सगळ्यांनाच असं वाटत असतं की, ते नेहमीच तरूण आणि सुंदर दिसावे. जसजसं वय वाढतं चेहऱ्याची चमक हरवू लागते. वाढत्या वयासोबत त्वचेची चमक आणि सुंदरता कायम ठेवण्यासाठी केवळ ब्युटी प्रोडक्ट्स कामात येत नाहीत. वय वाढण्यासोबत तुम्हाला तुमचं शरीर आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी आपल्या खास डाएटवर फोकस केलं पाहिजे.
जर तुम्हाला जास्त काळ तरूण दिसायचं असेल तर 30 वय झाल्यावर आपल्या खाण्या-पिण्यात सुधारणा करा. तुम्ही जे खाता पिता त्यावर या गोष्टी अवलंबून असतात. यासाठी दिवसाची सुरूवात चहाऐवजी ग्रीन टी ने करा. यात भरपूर व्हिटॅमिन्स, अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि असे तत्व असतात जे त्वचा चांगली राखण्यास मदत करतात.
ग्रीन टी त्वचेसाठी अॅंटी-एजिंग म्हणून काम करते. याने चेहऱ्यावरील सुरकुत्या, फाइन लाइन्स सारख्या समस्या दूर करण्यास मदत करते. याने तुमच्या त्वचेमध्ये ओलावा कायम ठेवण्यास मदत मिळते. याने त्वचेच्या इलास्टिसिटीमध्ये सुधारणा होते. तसेच याने पोटही हेल्दी राहतं. पिंपल्स येत नाहीत.
ग्रीन टी मुळे होणारे फायदे
चांगली झोप
ग्रीन टी मध्ये L-theanine नावाचं अमीनो अॅसिड असतं. याने एग्झायटी कमी होते आणि डोकं शांत राहतं. याचाच परिणाम म्हणजे तुम्हाला झोप चांगली येते.
हेल्दी आणि ग्लोइंग स्किन
झोपण्याच्या एक तासापूर्वी ग्रीन टी सेवन केल्याने स्किनला फायदा होतो. रात्री स्किन रिलॅक्ड असते, ज्याने ग्रीन टी ला शरीर चांगल्या प्रकारे टॉक्सिन फ्री करण्यास मदत मिळते. याने त्वचा हेल्दी आणि ग्लोइंग होते.
वजन कमी करण्यास मदत
इंटरमिटेंट फास्टिंगबाबत तर तुम्ही ऐकलं असेलच की, याने वजन कमी करण्यास कशी मदत होते. सोबतच जर तुम्ही झोपण्यापूर्वी ग्रीन टी चं सेवन कराल तुमची वेट लॉस प्रोसेस आणखी वेगाने काम करेल.
कोलेस्ट्रॉल
झोपेतून उठल्यावर शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि शुगरचं प्रमाण काही वेळासाठी नॅच्युरली हाय होतं. हे प्रमाण वाढणं आरोग्यासठी नुकसानकारक ठरू शकतं. यासाठी रात्री ग्रीन टी सेवन करणं सुरू करा. ग्रीन टी मुळे या दोन्ही गोष्टी नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते.
इम्यून सिस्टीम
झोपताना शरीर रिलॅक्स असतं आणि याच काळात शरीराचा स्ट्रेस कमी केला जातो. ग्रीन टीमुळे यात मदत मिळते. चांगल्या झोपेमुळे इम्यून सिस्टीम मजबूत होतं. अशात ग्रीन टी अधिक फायदेशीर ठरते. याने चांगली झोप तर येतेच सोबतच यातील अॅंटी-ऑक्सिडेंट तत्वामुळे शरीराचं इम्यून सिस्टीमही मजबूत होतं.