मंकीपॉक्स पासून वाचण्यासाठी अशाप्रकारे वाढवा इम्युनिटी, साधे सोपे घरगुती उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 05:38 PM2022-07-25T17:38:36+5:302022-07-25T17:38:44+5:30

मंकीपॉक्स हा धोकादायक आजार असला, तरी आहारामध्ये काही गोष्टींचा समावेश केल्यास मंकीपॉक्सचे रुग्ण वेगाने बरे होत असल्याचेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. या गोष्टी कोणत्या आहेत त्याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

this is how you should boost immunity to avoid monkey pox | मंकीपॉक्स पासून वाचण्यासाठी अशाप्रकारे वाढवा इम्युनिटी, साधे सोपे घरगुती उपाय!

मंकीपॉक्स पासून वाचण्यासाठी अशाप्रकारे वाढवा इम्युनिटी, साधे सोपे घरगुती उपाय!

Next

कोरोनाचं संकट अद्याप टळलं नसतानाच, जगभरात मंकीपॉक्स (Monkeypox) या आजाराने थैमान घातलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) हा आजार जागतिक आरोग्य आणीबाणी (Health Emergency) म्हणून घोषित केला आहे. भारतातदेखील मंकीपॉक्सचे (Monkeypox in India) आतापर्यंत चार रुग्ण आढळल्यामुळे आरोग्य मंत्रालयाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. मंकीपॉक्स हा धोकादायक आजार असला, तरी आहारामध्ये काही गोष्टींचा समावेश केल्यास मंकीपॉक्सचे रुग्ण वेगाने बरे होत असल्याचेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. या गोष्टी कोणत्या आहेत त्याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. TV9 हिंदीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

मंकीपॉक्सच्या लक्षणांपैकी सर्वांत महत्त्वाचं लक्षण (Monkeypox symptoms) म्हणजे, शरीरावर चिकनपॉक्सप्रमाणे फोड दिसून येणं. मंकीपॉक्स झाल्यानंतर वेगाने बरं होण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणं गरजेचं आहे. त्यामुळेच तुमची इम्युनिटी बूस्ट (Immunity Booster food) करण्यासाठी काही पदार्थांचा समावेश आहारात करणं आवश्यक आहे. यामध्ये तुळशीची पानं, पुदिना आणि व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थ यांचा समावेश होतो.

तुळशीची पानं
तुळशीच्या पानांचं महत्त्व आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे. एक औषधी वनस्पती म्हणूनही तुळशीकडे पाहिलं जातं. तुळशीची पानं (Tulsi leaves) पाण्यामध्ये टाकून ठेवावी, आणि काही काळानंतर हे पाणी रुग्णाला प्यायला द्यावं; यामुळे रुग्ण लवकर बरा होतो. ज्या लोकांना मंकीपॉक्सची लागण झालेली नाही, अशा व्यक्तींनीही दररोज हा काढा (Tulsi charged water) प्यायला हवा. यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल.

पुदिना
तुळशीसोबतच पुदिनादेखील आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे. एरव्ही एखाद्या पदार्थाची चव वाढवण्यासाठी त्यात पुदिन्याचा (Mint Leaves health benefits) वापर केला जातो, मात्र याचे औषधी गुणधर्मही आहेत. विशेषतः पोटदुखीवर पुदिन्यामुळे भरपूर आराम मिळतो. पुदिनायुक्त पदार्थ खाल्ल्यामुळे मांसपेशींवर आलेला ताण दूर होतो. सोबतच, दम्यासारख्या गंभीर आजारावरही पुदिना गुणकारी समजला जातो. पुदिनायुक्त हर्बल टी प्यायल्यामुळे खोकल्याची समस्यादेखील दूर होते.

व्हिटॅमिन सी
कोरोना काळातदेखील ‘व्हिटॅमिन सी’चं महत्त्व तुम्ही ऐकलंच असेल. खरं तर हे व्हिटॅमिन आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं. इम्युन सिस्टीम (Immune system) चांगली असल्यास कित्येक आजार तुमच्यापासून दूर राहतात. या आजारांमध्येच मंकीपॉक्सचाही समावेश आहे. अर्थात, याबाबत अद्याप कोणताही पुरावा समोर आला नाही. तुम्हाला लिंबू, संत्री अशा आंबट पदार्थांमधून व्हिटॅमिन सी (Vitamin C sources) मिळू शकतं किंवा जर तुम्हाला आंबट पदार्थ आवडत नसतील, तर पपई या फळातूनही तुम्हाला मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी मिळू शकेल.

भारतात आतापर्यंत मंकीपॉक्सचे चार रुग्ण आढळून आले आहेत. यातील एक रुग्ण दिल्लीमध्ये आणि तीन रुग्ण केरळमध्ये आहेत. इतर देशांमध्ये मंकीपॉक्सचा प्रसार वेगाने होत असताना, भारतात ती स्थिती येऊ नये यासाठी आपल्यालाच खबरदारी बाळगावी लागणार आहे.

Web Title: this is how you should boost immunity to avoid monkey pox

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.