Diabetes : ब्लड शुगर कमी करण्यासाठी फायदेशीर आहे हे एक फळ, गोड खाण्याचीही इच्छा होईल पूर्ण!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 02:06 PM2022-02-23T14:06:48+5:302022-02-23T14:07:22+5:30

diabetes Diet : वैज्ञानिकांनी स्ट्रॉबेरीच्या सेवनाचा ब्लड शुगरच्या स्तरावर प्रभावाबाबत रिसर्च केला. या रिसर्चमध्ये १४ पेक्षा जास्त लोकांना सहभागी करून घेतलं होतं ज्यांचं वजन जास्त होतं.

This one food is very beneficial for diabetes patient | Diabetes : ब्लड शुगर कमी करण्यासाठी फायदेशीर आहे हे एक फळ, गोड खाण्याचीही इच्छा होईल पूर्ण!

Diabetes : ब्लड शुगर कमी करण्यासाठी फायदेशीर आहे हे एक फळ, गोड खाण्याचीही इच्छा होईल पूर्ण!

googlenewsNext

डायबिटीसच्या (Diabetes) रूग्णांना खाण्या-पिण्याबाबत फार काळजी घ्यावी लागते. या रूग्णांना नेहमीच गोड पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. पण एका रिसर्चनुसार, एक फळ असंही आहे ज्यात आवश्यक व्हिटॅमिन असतात आणि हे फळ डायबिटीसच्या रूग्णांसाठी चांगला पर्याय आहे. फूड अ‍ॅन्ड फंक्शन जर्नलमध्ये प्रकाशित एका रिसर्चमध्ये स्ट्रॉबेरी हे एक सुपरफूड म्हटलं आहे ज्याने ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल केली जाते. तसेच गोड खाण्याची इच्छाही याने दाबली जाते.

काय सांगतो रिसर्च?

वैज्ञानिकांनी स्ट्रॉबेरीच्या सेवनाचा ब्लड शुगरच्या स्तरावर प्रभावाबाबत रिसर्च केला. या रिसर्चमध्ये १४ पेक्षा जास्त लोकांना सहभागी करून घेतलं होतं ज्यांचं वजन जास्त होतं. या सहभागी लोकांना तीन वेगवेगळ्या वेळेला स्ट्रॉबेरी ड्रिंक पिण्यास सांगण्यात आलं. रिसर्चमधून आढळलं की, ज्या लोकांनी जेवणाच्या दोन तासांआधी स्ट्रॉबेरीचं ज्यूस सेवन केलं, त्यांच्यात ब्लड शुगरचं प्रमाण त्यांच्या तुलनेत बरंच कमी होतं ज्यांनी हे ड्रिंक जेवणासोबत घेतलं. 

काय सांगतात एक्सपर्ट?

हेल्थ एक्सपर्ट म्हणाले की, स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी आणि मॅग्नेशिअम भरपूर प्रमाणात असतात. व्हिटॅमिन सी अ‍ॅंटी-ऑक्सीडेंटप्रमाणे काम करतं जे डायबिटीससंबंधी समस्या कमी करण्यास फायदेशीर ठरतं. यात फायबरचंही प्रमाण असतं ज्याने ब्लड शुगर लेव्हल सुधारते. एक कप स्ट्रॉबेरीमध्ये ७ ते ८ ग्रॅम कार्ब्स आणि ३५ ते ४० कॅलरी मिळतात. 

ही पण काळजी घ्या

स्ट्रॉबेरी अ‍ॅंटी-ऑक्सीडेंटने भरपूर आहे आणि डायबिटीसच्या रूग्णांसाठी याचे अनेक फायदे आहेत. पण याच्या प्रमाणावर आणि वेळेवर लक्ष देण्याची गरज आहे. एक्सपर्टनुसार, डायबिटीसच्या रूग्णांसाठी ४ ते ५ स्ट्रॉबेरी ब्रेकफास्ट आणि तेवढेच सायंकाळी नाश्त्यात खावेत. यातील फायबरमुळे अनेक पोषक तत्व मिळतात. 

Web Title: This one food is very beneficial for diabetes patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.