मूळव्याध मूळापासून नष्ट करेल 'हे' सोपे उपाय, आयुर्वेद डॉक्टरांनी दिला खास सल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 11:05 AM2024-05-11T11:05:12+5:302024-05-11T11:05:36+5:30

Home Remedies For Piles: काही आयुर्वेदिक उपाय करूनही तुम्ही ही समस्या दूर करू शकता. आयुर्वेद डॉक्टर रोबिन शर्मा यांनी यावर काही उपाय सांगितले आहे.

'This' simple remedy will destroy piles from the root, Ayurveda doctor gave special advice! | मूळव्याध मूळापासून नष्ट करेल 'हे' सोपे उपाय, आयुर्वेद डॉक्टरांनी दिला खास सल्ला!

मूळव्याध मूळापासून नष्ट करेल 'हे' सोपे उपाय, आयुर्वेद डॉक्टरांनी दिला खास सल्ला!

Home Remedies For Piles: पाइल्स (Piles) म्हणजेच मूळव्याध एक कॉमन समस्या आहे जी कुणालाही होऊ शकते. सामान्यपणे ही समस्या जास्तकरून त्या लोकांना होते जे लोक जास्त मसालेदार, कमी फायबर असलेले पदार्थ, कमी पाणी पितात आणि फार कमी फिजिकल अॅक्टिविटी करतात. या समस्येत गुदद्वाराच्या आत आणि बाहेर फोड होतात. ज्यामुळे गंभीर वेदना होतात.

मूळव्याध झाला तर व्यक्तीचं उठणं-बसणंही अवघड होतं आणि चालणं-फिरणही अवघड होतं. ही समस्या वेळीच दूर केली नाही तर टॉयलेट करताना रक्तही येतं. अशात काही आयुर्वेदिक उपाय करूनही तुम्ही ही समस्या दूर करू शकता. आयुर्वेद डॉक्टर रोबिन शर्मा यांनी यावर काही उपाय सांगितले आहे. ते म्हणाले की, ही समस्या जास्त काळ राहिली तर पचन तंत्र खराब होतं आणि वेगवेगळ्या समस्या होतात.

घरगुती उपाय

मूळव्याध दूर करण्यासाठी वेगवेगळी औषधं मिळतात आणि काही केसेसमध्ये सर्जरीही केली जाते. पण ही समस्या काही घरगुती उपायांच्या माध्यमातूनही नष्ट केली जाऊ शकते. तेच आज जाणून घेऊ....

काय खाऊ नये

डॉक्टरनुसार, मूळव्याध झाला असेल तर जास्त मसालेदार, उशीरा पचन होणारे पदार्थ जसे की बटाटे, वांगी किंवा फार जास्त गोड पदार्थ किंवा जास्त चटपटीतही काही खाऊ नये.

आयुर्वेदिक जडीबूटी

बडीशेप, ओवा, सैंधव मीठ, काळं मीठ, जेष्ठमध, हरडा, जिरं आणि हींगसारख्या जडीबुटीचं मिश्रण बनवून सेवन करायला हवं. तुम्ही हे मिश्रण कोमट पाण्यासोबत घेऊन शकता.

लाइफस्टाईलमध्ये बदल

सगळ्यात आधी तुमच्या लाइफस्टाईलमध्ये बदल करायला हवा. यात फायबरचा आहारात समावेश करणे, जास्त पाणी पिणे आणि पोट नेहमी साफ ठेवणं यांचा समावेश आहे. तसेच नियमितपणे व्यायामही करा. शिवाय बद्धकोष्ठतेची समस्या लगेच दूर कराल तर मूळव्याधही दूर होईल.

काय खावे

तुम्ही तुमच्या आहारात दही, वेगवेगळी फळं, हिरव्या पालेभाज्या आणि इसबगोलचं सेवन वाढवा. या गोष्टींमुळे पचन तंत्र चांगलं राहतं आणि मलत्याग करण्यास मदत मिळते.

एलोवेरा जेल आणि मेथीचे दाणे

एलोवेरा जेल सूज कमी करण्याचं काम करतं आणि जखम भरण्यासही मदत करतं. गुदद्वारेच्या बाहेरच्या जखमेवर हे जेल लावल्याने खाज आणि जळजळ दूर होते. मेथीचे दाणे पाण्यात भिजवून ठेवून सकाळी रिकाम्या पोटी या पाण्याचं सेवन केलं तर मूळव्याध दूर होऊ शकतो.

Web Title: 'This' simple remedy will destroy piles from the root, Ayurveda doctor gave special advice!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.