तुमचं हृदय किती फिट आहे हे जाणून घेण्याची खास सोपी टेस्ट, रिसर्चमधून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 10:43 AM2023-08-02T10:43:38+5:302023-08-02T10:47:26+5:30

Heart Health : स्पेनच्या अभ्यासकांचं मत आहे की, पायऱ्या चढून तुम्ही तुमच्या हृदयाच्या आरोग्याबाबत जाणून घेऊ शकता. 

This test will reveals how fit is your heart health study claims | तुमचं हृदय किती फिट आहे हे जाणून घेण्याची खास सोपी टेस्ट, रिसर्चमधून खुलासा

तुमचं हृदय किती फिट आहे हे जाणून घेण्याची खास सोपी टेस्ट, रिसर्चमधून खुलासा

googlenewsNext

Heart Health : आजच्या धावपळीच्या जीवनात हृदय निरोगी आणि फिट ठेवणं फारच अवघड झालं आहे. त्यासाठी लोक वेगवेगळे उपायही करतात. पण तुमचं हृदय किती फिट आहे हे कसं ओळखाल? तर यासाठी एक ट्रिक तुम्ही करू शकता. स्पेनच्या अभ्यासकांचं मत आहे की, पायऱ्या चढून तुम्ही तुमच्या हृदयाच्या आरोग्याबाबत जाणून घेऊ शकता. 

रिसर्चमध्ये अभ्यासकांनी सांगितलं की, जर तुम्ही 1 मिनिटाच्या आत 60 पायऱ्या चढत असाल तर याचा अर्थ हा आहे की, तुमचं हृदय पूर्णपणे निरोगी आणि फिट आहे. स्पेनच्या यूनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये कार्डिओलॉजिस्ट आणि या रिसर्चचे लेखक डॉक्टर जीसस पेटेइरो सांगितले की, 'स्टेअर्स(पायऱ्या) टेस्ट हृदयाचं आरोग्य जाणून घेण्याची एक सोपी पद्धत आहे. जर तुम्हाला 60 पायऱ्या चढायला दीड मिनिटांपेक्षा अधिक वेळ लागत असेल तर याचा अर्थ आहे की, तुमचं हृदय पूर्णपणे फिट नाही आणि तुम्हाला डॉक्टरांना सल्ला घेणं गरजेचं आहे'.

165 लोकांवर करण्यात आलेल्या या रिसर्चमध्ये मेटाबॉलिक इक्विवेलंट मोजण्यासाठी आधी लोकांना त्यांच्या एक्सरसाइज क्षमतेनुसार, ट्रेडमिलवर त्यांना थकवा येईपर्यंत चालण्यास सांगण्यात आले. त्यानंतर थोडा आराम करून त्यांना वेगाने 60 पायऱ्या चढायला सांगण्यात आलं आणि यांचं मेटाबॉलिक इक्विवेलेंट पुन्हा मोजण्यात आलं'.

40 ते 45 सेकंदापेक्षाही कमी वेळात पायऱ्या चढणाऱ्या लोकांचं मेटाबॉलिक इक्विवेलेंट 9 ते 10 METs होतं. आधीच्या रिसर्चमध्ये एक्सरसाइज टेस्ट दरम्यान 10 METs मिळणाऱ्यांमध्ये मृत्यू दर कमी झाला. लोकांना पायऱ्या चढायला 1.5 मिनिटे लागलीत किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागला त्यांचं METs 8 पेक्षा आलं.

तेच एक मिनिटापेक्षाही कमी वेळेत पायऱ्या चढणाऱ्या 32 टक्के लोकांच्या तुलनेत ज्या 58 टक्के लोकांनी पायऱ्या चढायला 1.5 मिनिटांपेक्षा अधिकचा वेळ घेतला, एक्सरसाइज दरम्यान त्यांची हृदय कार्यक्षमता अनियमित आढळून आली. पण या रिसर्चवर काही लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

लोकांचं मत आहे की, प्रत्येक 3 पैकी 1 रिसर्चमध्ये आढळून आलं आहे की, ज्या सहभागी लोकांनी लवकर पायऱ्या चढल्या त्यांच्या हृदयाची कार्यक्षमता पूर्णपणे ठीक आढळून आली. यावरून हे दिसतं की, त्यांना हृदयाचे आजार होऊ शकतात.

Web Title: This test will reveals how fit is your heart health study claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.