हिवाळ्यात 'ही' भाजी खा, मधुमेहासारख्या आजारांना दूर ठेवा, आजच करा आहारात समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 01:41 PM2022-11-09T13:41:43+5:302022-11-09T13:50:00+5:30
थंडीमध्ये अनेक ताज्या आणि शरिरासाठी पोषक अशा भाज्या मिळतात. यात एका भाजीचा आवर्जून समावेश होतो ती म्हणजे मुळा.
हिवाळ्यात मिळणाऱ्या हंगामी भाज्या शरिरासाठी फायदेमंद असतात. थंडीमध्ये अनेक ताज्या आणि शरिरासाठी पोषक अशा भाज्या मिळतात. यात एका भाजीचा आवर्जून समावेश होतो ती म्हणजे मुळा. आजार पळवण्यासाठी मुळा या भाजीत दडलेले गुणधर्म कामी येतात.
मुळा तर सामान्यत: अनेक ठिकाणी मिळणारी अशी भाजी आहे. घराघरात मुळा खाल्लाच जातो. पोटाचे विकार ते अगदी कॅन्सरवर देखील मुळा फायदेशीर आहे. अनेकांना मुळा आवडत नसला तरी मुळ्याचे पराठे बघून तोंडाला नक्कीच पाणी सुटते. अनेक पद्धतींनी मुळ्याचा उपयोग खाण्यासाठी केला जाऊ शकतो.
मुळ्यात कैटेचिन, पाइरोगॉलोल, वैनिलिक अॅसिड असते जे शरिराला पोषक त्तवे पुरवतात. मुळा हा अॅंटिऑक्सिडेंट चा मोठा स्त्रोत आहे. या भाजीत व्हिटॅमिन सुद्धा मुबलक प्रमाणात असते.
डायबिटिस पासून राहाल दूर
मुळामध्ये असणारे शक्तिशाली गुणधर्म मधुमेहावरही नियंत्रण मिळवतात. यामुळे शरिरातील ग्लुकोज वाढते तर ब्लड शुगर लेव्हलही नियंत्रणात राहते. यामध्ये असणारे एडिपोनेक्टिन हार्मोन ब्लड शुगर लेव्हल रेग्युलेट करण्याचे काम करतात.
पचनासाठी फायदेशीर
थंडीत पचनावर रामबाण उपाय म्हणजे मुळा. मुळा हा सॅलड म्हणून नुसता देखील खाता येतो. थंडीत अनेकदा पचनाचे विकार जाणवतात. त्यासाठी रोज मुळा खाणे फायदेशीर आहे. फक्त मुळा आवडत नसेल तरी इतर प्रकारे मुळा पोटात गेला पाहिजे.
रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत राहते
मुळा पोटॅशियमसाठी उत्तम स्त्रोत आहे. तसेच रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत सुरु राहावी आणि रक्तदाब नियंत्रणात असावा यासाठी मुळा खुपच फायदेमंद आहे.