World Diabetes Day टाईप २ डायबिटिज काय असतो? 'या' गोष्टी करा आणि मधुमेह नियंत्रणात ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 12:30 PM2022-11-14T12:30:52+5:302022-11-14T12:33:14+5:30

आज वर्ल्ड डायबिटिस डे आहे. डायबिटिस बाबत आपल्याला सगळ्याच गोष्टी माहित असतात असे नाही. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने माहिती देत असतं. आपापले अनुभव सांगत असतं. तर आज आपण माहिती घेऊया टाईप २ डायबिटिजची. 

This-world-diabetes-day-start-these-practice-daily-to-control-blood-sugar-level | World Diabetes Day टाईप २ डायबिटिज काय असतो? 'या' गोष्टी करा आणि मधुमेह नियंत्रणात ठेवा

World Diabetes Day टाईप २ डायबिटिज काय असतो? 'या' गोष्टी करा आणि मधुमेह नियंत्रणात ठेवा

Next

World Diabetes Day : आज वर्ल्ड डायबिटिस डे आहे. डायबिटिस बाबत आपल्याला सगळ्याच गोष्टी माहित असतात असे नाही. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने माहिती देत असतं. आपापले अनुभव सांगत असतं. तर आज आपण माहिती घेऊया टाईप २ डायबिटिजची. 

Type 2  Diabetes टाईप २ डायबिटीज मध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहणे गरजेचे आहे. जेव्हा साखरेचे प्रमाण योग्य नसते तेव्हा गंभीर आजारांनी सामोरे जावे लागते. किडनी रोग, हार्ट अटॅक, स्ट्रोकचा धोका वाढतो. डायबिटीजला नियंत्रणात आणले जाऊ शकते पण त्यासाठी तुमच्या जीवनशैलीत बदल केले पाहिजे. पोषक आहार घेतला पाहिजे. रोज सकाळी फिरायला जाणे, झोप व्यवस्थित घेणे, नियमित साखरेचे प्रमाण तपासत राहणे या गोष्टी केल्या पाहिजेत. या काही गोष्टी आहेत ज्यांचे नियमित पालन केल्याने साखरेचे प्रमाण नियंत्रित राहील. 

सकाळी उठून व्यायाम करणे 

कोणत्याही व्यक्तीने नियमित व्यायाम केला तर तो व्यक्ती निरोगी राहू शकतो. मधुमेह रुग्णांनी तर रोज सकाळी न कंटाळता व्यायाम केलाच पाहिजे. मधुमेहादरम्यान साखरेचे प्रमाण सतत वर खाली होत असते. म्हणून कोणताही व्यायाम किंवा योगासने तुमच्या जीवनाचा भाग असला पाहिजे.

पोषक नाश्ता 

हाय ब्लड शुगर असलेल्यांनी रोज सकाळी नाश्ता केला पाहिजे. सकाळचा पौष्टिक नाश्ता ब्ल्ड शुगर लेव्हल नियंत्रित करतो. तसेच दिवसभर प्रसन्न वाटते. डॉक्टरही सकाळच्या नाश्त्याचा आवर्जुन सल्ला देतात. 

पाण्याचे प्रमाण कमी होऊ देऊ नका

दोन ग्लास कोमट पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करा. त्यानंतर दिवसभरात सतत पाणी प्यायले पाहिजे. मधुमेह रुग्णांसाठी सतत हायड्रेट राहणे गरजेचे आहे. यामुळे ब्ल्ड लेव्हल नियंत्रणात राहते. 

शुगर लेव्हल तपासत राहा

मधुमेह रुग्णांनी नियमित ब्लड लेव्हल तपासत राहिली पाहिजे. यामुळे तुमचा तुम्हालाच अंदाज येईल की आपल्याला काय काय उपाय करण्याची गरज आहे. शुगर लेव्हल नियंत्रणात नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 

Web Title: This-world-diabetes-day-start-these-practice-daily-to-control-blood-sugar-level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.