घश्यातील खवखव आणि श्वसनाच्या समस्यांना दूर ठेवण्यासाठी 'हा' सोपा उपाय ठरेल प्रभावी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 11:11 AM2020-07-22T11:11:15+5:302020-07-22T11:22:42+5:30
घशात किंवा तोंडात असलेल्या बॅक्टेरियांमुळे असा त्रास होतो.
बदलत्या वातावरण खोकला, कफ, सर्दीची समस्या सगळ्यांनाच उद्भवते. अनेकदा तोंडातून वास येतो. चारचौघात बोलताना तोंडातून वास येत असेल तर अवघडल्यासारखं होतं. घसा खवखवणं, सुका खोकला, तोंडातून वास येणं या समस्यांना तुम्ही स्वतःपासून लांब ठेवू शकता. घशात किंवा तोंडात असलेल्या बॅक्टेरियांमुळे असा त्रास होतो. मात्र गरम पाण्याच्या गुळण्या करून तुम्ही या आजारांपासून स्वतःला लांब ठेवू शकता. पाण्याच्या गुळण्या केल्याने शरीराला एक नाही तर अनेक फायदे मिळतात. आज आम्ही तुम्हाला पाण्याच्या गुळण्या करण्याचे शरीराला होणारे फायदे सांगणार आहोत.
पाण्याच्या गुळण्या करण्यासाठी स्वतःचा एक ग्लास वेगळा ठेवा. कारण अनेकांना हातात पाणी घेऊन गुळण्या करण्याची सवय असते. शक्यतो ग्लासने पाणी घेऊन गुळण्या करा.
हिरड्या संवेदनशील असतात. थंड पाण्याच्या वापराने तोंडात जळजळ होऊ शकते. त्यामुळे कोमट पाण्याचा वापर करा. गुळण्या करताना तुम्ही या पाण्यात मीठ घालू शकता.
घसा खवखवत असेल किंवा सुज आल्याने वेदना होत असतील तर पाण्यात एक चमचा मध घाला. त्यामुळे तोंडातील बॅक्टेरियांची वाढ रोखण्यास मदत होईल.
मीठ हे एक जंतूनाशक आहे. त्यामुळे गरम पाण्यात मीठ घालून गुळण्या करायला हव्यात. त्यामुळे घश्यातील सुज कमी होण्यास मदत होते.
गुळण्या करताना कोमट पाण्यात बेकिंग सोडा घातल्याने श्वासांमधून येणारी दुर्गधी कमी होण्यास मदत होते. गुळण्या करत असताना तोंडाची हालचाल करा. जीभ आतल्याआत सगळ्या बाजूला फिरवा. पाणी घशापर्यंत नेऊन पुन्हा पुढे आणा. अशा पद्धतीने गुळण्या केल्यास घश्यातील वेदना कमी होण्यास मदत होईल.
२०-३० सेकंद गुळण्या करताना पाणी तोंडात ठेवल्यानंतर सावधगिरीने पाणी बाहेर फेकून द्या. गुळण्या करून झाल्यानंतर दात स्वच्छ घासा.
आता कोरोना चाचणी २० मिनिटात होणार; 'या' चाचणीने कमी होईल संक्रमणाचा वेग, तज्ज्ञांचा दावा
कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे मेंदूवर 'असा' होतोय परिणाम; तज्ज्ञांनी सांगितली नवी लक्षणं