थायरॉईडच्या रुग्णांनी चूकूनही खाऊ नका या गोष्टी, पडू शकतात महागात...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 03:59 PM2021-06-02T15:59:25+5:302021-06-02T16:01:30+5:30
अनेक लोकांना थायरॉईड होतो. त्यामुळे त्याबद्दल अधिक जाणून घेणे महत्वाचे आहे. त्याची वेळीच काळजी घेणं आवश्यक आहे नाहीतर, त्याचे गंभीर परीणाम होतात.
बदलती जीवनशैली अनेक रोगांना आमंत्रण देते. जीवघेणी स्पर्धा, खाण्यापिण्याच्या वेळा न पाळणे, अवेळी झोप यामुळे अनेक आजार निर्माण होतात. अशाच आजारांपैकी एक म्हणजे थायरॉईड. आजकाल या आजाराची समस्या वाढते आहे. अनेक लोकांना थायरॉईड होतो. त्यामुळे त्याबद्दल अधिक जाणून घेणे महत्वाचे आहे.
थायरॉईडचे दोन प्रकार आहेत हायपर थायरॉईड, हायपो थायरॉईड. या दोघांमध्ये फरक असा की हायपरथारॉईडमध्ये थायरॉईडचे हार्मोन्स जास्त तयार होतात. तर हायपोथारॉईडमध्ये ते कमी प्रमाणात तयार होतात. थायरॉईड कोणताही असो त्याची वेळीच काळजी घेणं आवश्यक आहे नाहीतर, त्याचे गंभीर परीणाम होतात. डॉ. रेन रमण यांनी थॉयराईड असलेल्या व्यक्तींनी कोणते अन्नपदार्थ खाऊ नयेत याची हेल्थलाईन या संकेतस्थळाला माहिती दिली आहे.
सोयाबीन
थॉयराईड असलेल्या रुग्णांनी सोयाबीनचे सेवन बिल्कुल करू नये. सोयाबीनसारख्या पदार्थांमध्ये फयटोएस्ट्रोजन असते. जे थायराईडच्या रुग्णांसाठी घातक असते.
कॉफी किंवा अल्कोहोल
कॉफी किंवा अल्कोहोलचा त्याचा थॉयराईड ग्रंथीवर विपरीत परीणाम होतो. त्यामुळे थायरॉईडच्या रुग्णांनी कॉफी आणि अल्कोहोलचे सेवन करूच नये. जर तुम्ही याचे सेवन केले तर तुमचे थॉयरॉईड वाढू शकते. तसेच जर तुम्ही थायरॉईडची औषध घेत असाल तर त्यावरही परीणाम होऊ शकतो.
प्रोसेस्ड फुड
थायरॉईडच्या रुग्णांनी प्रोसेस्ड फुड अजिबात खाऊ नये. यात सोडियमचे प्रमाण जास्त असते जे थायरॉईडसाठी घातक असते.
साखर
साखरेचे जास्त प्रमाण कधीही घातकच पण थारॉईडच्या रुग्णांसाठी अतिघातक. थायरॉईडच्या रुग्णांचे वजन लवकर वाढते. साखरेमुळे ते अधिक वेगाने वाढू शकते.