हात आणि पायांमध्ये झिणझिण्या येतात? या गंभीर आजारांचे असू शकतात संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 09:58 AM2024-04-13T09:58:00+5:302024-04-13T09:58:22+5:30
Tingling feet & hand : या समस्येचं कारण दबाव, ट्रॉमा किंवा तंत्रिकांमध्ये काही इजा होणे सांगता येईल. त्याशिवाय आणखी काय कारणं असू शकतात हे जाणून घेऊ.
Tingling feet & hand : सगळ्यांनाच कधी ना कधी हात किंवा पायांवर झिणझिण्या किंवा टोचल्यासारखं जाणवलं असेल. असं सामान्यपणे तेव्हा होतं जेव्हा आपण हातावर झोपतो किंवा काही वेळ पाय क्रॉस करून बसतो. अशात पाय किंवा हातांमध्ये सुन्नपणा, वेदना किंवा कमजोरी जाणवते. या समस्येचं कारण दबाव, ट्रॉमा किंवा तंत्रिकांमध्ये काही इजा होणे सांगता येईल. त्याशिवाय आणखी काय कारणं असू शकतात हे जाणून घेऊ.
मधुमेह न्यूरोपॅथी
मधुमेह न्यूरोपॅथी तेव्हा होते जेव्हा मधुमेहामुळे नर्वस सिस्टम खराब होतं. यामुळे पाय, हात, खांदे प्रभावित होऊ शकतात. नसांना नुकसान पोहोचवण्याशिवाय नसांना रक्त पुरवठा करणाऱ्या ब्लड वेसेल्सना नुकसान पोहोचवतात. जेव्हा नसांना पुरेसं ऑक्सिजन मिळत नाही. तेव्हा त्या ठीकपणे काम करत नाही ज्यामुळे झिण्याझिण्या येतात.
नसा कोरड्या पडणे
शरीराच्या काही भागांमध्ये नस बदलेली असू शकते आणि हात किंवा पायांना प्रभावित करू शकते. ज्यामुळे झिणझिण्या, सुन्नपणा किंवा वेदना जाणवू शकतात. तुमच्या खालच्या मणक्यामध्ये दबलेल्या नसांमुळे वेदना तुमच्या पायांमध्ये पसरू शकते.
किडनी खराब
किडनी फेलिअर तेव्हा होते जेव्ह तुमची किडनी योग्यपणे काम करत नाही. हाय ब्लड प्रेशर किंवा डायबिटीससारख्या स्थिती किडनी फेल होण्याचं कारण बनू शकतात. जेव्हा तुमच्या किडनी योग्यपणे काम करत नाही तेव्हा किडनी खराब झाल्यावर नेहमीच पाय किंवा टाचांमध्ये झिणझिण्या होऊ लागतात.
ही समस्या दूर करण्याचे उपाय
झिणझिण्याची समस्या दूर करण्यासाठी काही गोष्टी शरीराला मिळणं आवश्यक आहे. यात व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन बी1, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी9 किंवा फोलेट यांचा समावेश आहे.