रात्री झोपेत हातांना झिणझिण्या येणं 'या' ५ आजारांकडे करतात इशारा, वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 11:29 AM2024-08-07T11:29:43+5:302024-08-07T11:30:23+5:30

Tingling in hands : ही समस्या कोणत्या कारणाने होते हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Tingling in hands while sleeping at night indicates these 5 disease | रात्री झोपेत हातांना झिणझिण्या येणं 'या' ५ आजारांकडे करतात इशारा, वेळीच व्हा सावध!

रात्री झोपेत हातांना झिणझिण्या येणं 'या' ५ आजारांकडे करतात इशारा, वेळीच व्हा सावध!

Tingling in hands : अनेक लोकांना रात्री झोपेत हाताना मुंग्या येण्याची समस्या होते. लोक या समस्येमुळे हैराण होतात, पण जास्तीत जास्त लोक या समस्येकडे दुर्लक्ष करतात. मात्र याकडे दुर्लक्ष करण तुम्हाला चांगलंच महागात पडू शकत. कारण ही समस्या ५ गंभीर आजारांचा संकेत असू शकते. अशात ही समस्या कोणत्या कारणाने होते हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

स्ट्रोक असू शकतं कारण

मेंदूमध्ये रक्तप्रवाह योग्य पद्धतीने होत नसल्याने रक्ताच्या गाठी तयार होतात. ज्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो. ही समस्या असलेल्या लोकांना रात्री हाताना मुंग्या येण्याची समस्या होते.

व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता

व्हिटॅमिन बी १२ शरीरात कमी झाल्याने वेगवेगळ्या समस्या होतात. त्यात हात सुन्न होणं किंवा हातांना झिणझिण्या येणं अशाही समस्या असतात. तुम्हाला सुद्धा ही समस्या होत असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवा. 

हार्ट अटॅक येण्याआधीचा संकेत

रात्री झोपेत हाताना झिणझिण्या येणं हा हार्ट अटॅक येण्याआधीचा संकेत असू शकतो. जर तुम्हाला ही समस्या नेहमीच होत असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवा. या स्थितीत इतरही काही लक्षणे दिसतात. जसे की, घाम येणे, मळमळ होणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा चक्कर येणे इत्यादी.

डायबिटीसचा धोका

झोपेत हाताना मुंग्या येणे किंवा झिणझिण्या येणे हा डायबिटीस असण्याचा संकेत असू शकतो. जेंव्हा आपल शरीर योग्य प्रमाणत इन्सुलिन तयार करू शकत नाही तेव्हा शरीर वेगवेगळे संकेत देत. हाताना झिणझिण्या येणं त्यापैकी एक संकेत आहे.

काही औषधांचे साईड इफेक्ट्स

काही औषधांमुळे सुद्धा हात आणि पायांना झिणझिण्या येण्याची समस्या होते. अशात तुम्ही काही औषध घेत असाल आणि ही समस्या सतत होत असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवा.

Web Title: Tingling in hands while sleeping at night indicates these 5 disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.