घामाच्या मदतीने आजाराची स्थिती सांगणारं पॅच सेन्सर!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 10:54 AM2019-01-23T10:54:51+5:302019-01-23T10:58:14+5:30
तुमचं आरोग्य किती धोक्यात आहे किंवा एखाद्या आजाराची स्थिती काय आहे हे सांगणारं एक सेन्सर नॉर्थवेस्टर्न यूनिव्हर्सिटीने विकसित केलं आहे.
(Image Credit : The New York Times)
तुमचं आरोग्य किती धोक्यात आहे किंवा एखाद्या आजाराची स्थिती काय आहे हे सांगणारं एक सेन्सर नॉर्थवेस्टर्न यूनिव्हर्सिटीने विकसित केलं आहे. हे पॅच सेन्सर घामाच्या मदतीने आजारांवर लक्ष ठेवू शकतं. या नाण्याच्या आकाराच्या पॅच सेन्सरच्या छिद्रांमध्ये जेव्हा घाम जातो तेव्हा यातील रसायनाच्या मदतीने रुग्णाला सावध केलं जातं. जे रुग्ण किडनी फेल्यूअर किंवा सिस्टिक फायब्रोसिसने ग्रस्त आहेत, त्यांना वेळेवर अलर्ट पाठवून सावध केलं जाऊ शकतं.
लॅबसारखं काम करतं हे सेन्सर
पॅच सेन्सरला मोबाइल फोनशी जोडलं गेलं आहे. त्यामुळे जेव्हा घामामध्ये लेक्टेट आणि ब्लड शुगरचं प्रमाण अधिक वाढतं तेव्हा सेन्सर रुग्णाला मेसेज पाठवून अलर्ट करतो. संशोधकांनी सांगितले की, जास्तीत जास्त रोगांच्या उपचारासाठी ब्लड टेस्ट केली जाते, पण पॅचच्या मदतीने घरी बसून कोणत्याही वेदनेशिवाय रुग्णाला माहिती मिळू शकते.
कशी केली जाते टेस्ट?
संशोधकांचं म्हणणं आहे की, पॅच एका लॅबप्रमाणे काम करतं. रुग्णाच्या घामाचे थेंब जेव्हा पॅच सेन्सरमध्ये जातात तेव्हा यातील बारीक नलिका क्लोराइड, लॅक्टेट, ग्लूकोज आणि पीएट लेव्हलचं प्रमाण जाणून घेऊ शकतात. येथून इलेक्ट्रिक सिग्नल जनरेट होऊन मोबाइलवर पाठवले जातात. ही माहिती रुग्ण मोबाइलवर बघू शकतात. जसे घामामधील पीएच लेव्हल चेक केल्यानंतर शरीरात लेक्टेट आणि ब्लड शुगरचं प्रमाण किती आहे हे सांगितलं जातं. शरीरात जर लेक्टेट जास्त असेल तर याचा अर्थ आहे की, ऑक्सिजनची कमतरता आहे. याला हायपॉक्सिया म्हटले जाते.
संशोधकांनी सांगितले की, घामाच्या मदतीने सर्वच आजारांची माहिती मिळवली जाऊ शकत नाही. पण रोज याने टेस्ट केल्यावर सिस्टिक फ्रायब्रोसिससारख्या गंभीर आजारांची स्थिती झाल्यास रुग्णाला अलर्ट पाठवला जाऊ शकतो. सिस्टिक फ्रायब्रोसिस फुफ्फुसाशी संबंधित रोग आहे. हा बदल जीनमध्ये बदल होण्याच्या कारणाने होतो. अशा स्थितीत पेशी आपलं काम योग्यप्रकारे करू शकत नाहीत. घाम आणि म्यूकसच्या रूपात शरीरातून अधिक तरल पदार्थ बाहेर येतात.
या रिसर्चनुसार, पेशींपासून घाम तयार होतो त्यामुळे यापासून हे जाणून येता येऊ शकतं की, रुग्णामध्ये सिस्टिक फ्रायब्रोसिस आजाराची स्थिती काय आहे. खासकरून एथेलिकशी निगडीत खेळाडूंमध्ये. रिसर्चमधून समोर आलं की, या सेन्सर रिअल टाइममध्ये योग्य स्थिती जाणून घेता येते. हे सेन्सर फार हलकं असून सॉफ्ट आणि इंट्रोफेस टेक्नॉलॉजीवर काम करणारं आहे. यात बॅटरी नाही. हे सेन्सर अधिक विकसित केलं जात असून याद्वारे डायबिटीज आणि किडनीशी संबंधित आजारांची माहिती घेण्याचा प्रयत्न असेल.